Video : रोहित शर्माबाबत मुंबई इंडियन्सने दिली मोठी अपडेट, खेळणार की नाही सर्वकाही केलं स्पष्ट

| Updated on: Mar 18, 2024 | 6:20 PM

आयपीएल 2024 स्पर्धेचा रंग आता चढू लागला आहे. गल्ली चौकात आता या स्पर्धेबाबत चर्चा रंगू लागली आहे. आपआपल्या आवडत्या संघाचं आपआपल्या पद्धतीने विश्लेषण केलं जात आहे. असं असताना मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्याला कर्णधारपद सोपवल्यानंतर काहीतरी घडत असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. आता मुंबई इंडियन्सने ट्वीट करून याबाबत जाहीरपणे सांगितलं आहे.

Video : रोहित शर्माबाबत मुंबई इंडियन्सने दिली मोठी अपडेट, खेळणार की नाही सर्वकाही केलं स्पष्ट
रोहित शर्माच्या त्या चर्चांवर मुंबई इंडियन्सने मौन सोडलं, व्हिडीओ ट्वीट करून दिली मोठी अपडेट
Follow us on

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सर्वाधिक चर्चा रंगली ती मुंबई इंडियन्स संघाबाबत..कारण रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून ते हार्दिक पांड्याकडे सोपवलं आहे. यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सची कमान हाती घेऊन सरावही सुरु केला आहे. असं असताना रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अजूनही रुजू न झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. आता सर्वच खेळाडू आपआपल्या संघाच्या कॅम्पमध्ये हजेरी लावत आहेत. तसेच प्लानिंगनुसार सरावही सुरु केला आहे. काही फॅन्स याचा संदर्भ थेट रोहित शर्माचं कर्णधारपदाशी जुळवत आहेत. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात जखमी सूर्यकुमार यादव सोडला तर सर्वच सराव करत आहेत. पण रोहित शर्मा फिट अँड फाईन असूनही मुंबईच्या कॅम्पपासून दूर आहे. पण आता सर्वच शंकाकुशंका दूर झाल्या आहेत. मुंबई इँडियन्सने एक व्हिडीओ ट्वीट करत रोहित संघासोबत आला असल्याचं सांगितलं आहे.

मुंबई इंडियन्सने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात दोन मुलं रोहितच्या आगमनाबाबत बोलत आहेत. मुंबईमध्ये तोडकमोडक बोलल्या जाणाऱ्या हिंदीत हा व्हिडीओ आहे. रोहित शर्मा अशाच भाषेत मैदानात बोलतो. वो आ रहा है..कौन..अरे वो जो गार्डनमें घुमने नहीं देता.पर मै तो घुमेगा..अरे भाई ज्यादा हिरो मत बन..अरे वो आ रहा है..हा..पूल शॉट का मास्टर..मुंबई का राजा..अरे मेरे को क्या दिखा रहा है, उसको दिखा..

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या दोन महिन्यांपासून सलग क्रिकेट खेळत आहे. अशात बीसीसीआयच्या वर्कलोड मॅनेजमेंटनुसार त्याला आरामाची गरज होती. त्यामुळे इतक्या दिवसांपासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रुजू झाला नव्हता. भारतीय संघ आयपीएलनंतर टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा या स्पर्धेपूर्वी आराम करत होता. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध असणार आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ

रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, देवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, विष्णू विनोद, रोमॅरियो शेफर्ड, शम्स शेफर्ड. नेहल वढेरा, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी.