IPL 2024 : रोहित शर्माबाबत हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्स संघाशी होणार आहे. 24 मार्च रोजी हा सामना होणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार बदलले असून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे, तर गुजरात टायटन्सचं कर्णधारपद शुबमन गिलकडे आलं आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून कर्णधारपदावरून बराच वादंग झाला. त्यावर आता हार्दिक पांड्याने मौन सोडलं आहे.

IPL 2024 : रोहित शर्माबाबत हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
IPL 2024 : हार्दिक पांड्याने अखेर मौन सोडले, रोहित शर्माबाबत सर्वकाही सांगून टाकलं
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 4:51 PM

मुंबई : आयपीएल स्पर्धेचा थरार आता काही दिवसात प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे. एकूण 10 संघांमध्ये जेतेपदासाठी जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे. 22 मार्चला पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स 24 मार्चला आमनेसामने येणार आहेत. मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात सहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज आहे. पण हार्दिक पांड्याच्या हाती नेतृत्व सोपवल्यानंतर बराच गोंधळ सोशल मीडियावर पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सच्या फॅन्समध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले. काही जणांनी रोहित शर्माला पाठिंबा दिला, तर काही जण हार्दिक पाठिशी ठामपणे उभे राहिले. रोहित शर्मा आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. असं सर्व चित्र असताना हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

हार्दिक पांड्याने रोहित शर्माबाबत सांगितलं की, ‘रोहित माझी मदत करण्यासाठी कायम सज्ज असेल. संघाने जे काही मिळवलं आहे ते रोहितच्या नेतृत्वात मिळवलं आहे. आता मला फक्त हे पुढे घेऊन जायचं आहे. रोहित शर्माचा हात माझ्या खांद्यावर असेल. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे. त्याची मदत मला होईलच. पूर्ण करिअरमध्ये मी रोहितच्या नेतृत्वात खेळलो आहे आणि मला माहिती आहे की त्याचा हात कायम पाठिशी असेल.’

हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं होतं. रोहित शर्माच्या गैरहजेरीत टीम इंडियाची धुरा सांभाळली होती. आयपीएल 2022 ते 2023 मध्ये गुजरात टायटन्सचं कर्णधारपद भूषवलं. तसेच एकदा जेतेपद आणि एका उपविजेतेपद पटकावलं आहे. दुसरीकडे 2021 नंतर मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याकडून मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीला बऱ्याच अपेक्षा आहेत. दुसरीकडे, रोहित शर्मा 2013 पासून 2023 पर्यंत मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता.

मुंबई इंडियन्सचा संघ

रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, देवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, विष्णू विनोद, रोमॅरियो शेफर्ड, शम्स शेफर्ड. नेहल वढेरा, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.