IPL 2024 Orange Cap: विराटशी पंगा कोण घेणार? गुजरातविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिलं

IPL 2024 Purple Cap,Highest run scorer: आयपीएल2024 स्पर्धेतील 52वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात बंगळुरुने बाजी मारली. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपणच किंग असल्याचं विराट कोहलीने दाखवून दिलं.

IPL 2024 Orange Cap: विराटशी पंगा कोण घेणार? गुजरातविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिलं
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 11:07 PM

आयपीएल स्पर्धेत सुरुवातीला निराशाजनक कामगिरी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची स्थिती एकदम सुधारली आहे. मागच्या काही सामन्यात धडाकेबाज खेळी करून भल्याभल्यांना धोबीपछाड दिला आहे. आता गुजरात टायटन्सला 4 गडी राखून मात दिली. तसेच गुणतालिकेत शेवटच्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकून गुजरातला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. गुजरात टायटन्स आव्हानात्मक धावा करण्यास अकार्यक्षम ठरला. गुजरात संघाने 19.3 षटकं खेळत 147 धावा केल्या आणि विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 13.4 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा नेट रनरेट सुधारला आहे. तसेच या सामन्यात विराट कोहलीची खेळी लक्षवेधी ठरली. त्याने 27 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या आणि ऑरेंज कॅप पुन्हा मिळवली आहे.

विराट कोहलीने 11 सामन्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांच्या जोरावर 542 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड 10 सामन्यात 509 धावा करत दुसऱ्या स्थानी आहे. मागच्या सामन्यात त्याने विराट कोहलीला 9 धावांनी पुढे जात गाठलं होतं. मात्र विराट कोहलीने पुन्हा 42 धावा करत त्याला मागे टाकलं आहे. या दोघांमध्ये 33 धावांच अंतर आहे. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन 424 धावांसह तिसऱ्या, राजस्थान रॉयल्सचा रियान पराग 409 धावांसह चौथ्या आणि लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल 406 धावांसह पाचव्या स्थानावर आहे. रविवारी पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून कॅप हिरावून घेतली जाता हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सर्वाधिक संधी ही चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्याकडे आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार विशक.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा, जोशुआ लिटल

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.