AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्लॅकमेलिंग, धमक्या, आमिषांनी विरोधकात पाडली फूट; मोदींवर खरगेंचा गंभीर आरोप

Mallikarjun Kharge on PM Modi : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. धमकी, आमिषं दाखवून विरोधकांना फोडण्यात आल्याचा घणाघात त्यांनी केला. त्यांनी ही भाजपची तोडफोड नीती असल्याचा आरोप केला.

ब्लॅकमेलिंग, धमक्या, आमिषांनी विरोधकात पाडली फूट; मोदींवर खरगेंचा गंभीर आरोप
खरगेंचा मोदींवर गंभीर आरोप
| Updated on: May 18, 2024 | 10:48 AM
Share

लोकसभा निडवणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. त्यापूर्वी इंडिया आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपसह महायुतीवर तोफ डागली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर निशाणा साधला. इंडिया आघाडीने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात मोदींनी धमकी, आमिषं दाखवून विरोधक फोडल्याचा दावा केला. मोदी जनतेला भडकविण्याचे काम करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.

विश्वासघाताचे पॉलिटिक्स

  • मोदी सरकार देशात विश्वासघातचे राजकारण करत असल्याचा आणि घटनात्मक संस्थेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप खरगे यांनी केला. मोदी सरकार धमकी,आमिषं आणि ब्लॅकमेल करुन विरोधकांना फोडण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी मोदींवर केला. विरोधकांमध्ये फुट पाडण्यात येत आहे.
  • जो मुळ पक्ष आहे. तो हिसकविण्याचे प्रकार देशात सुरु आहे. मुळ पक्षाचे निशाण, पक्ष चोरी वाढली आहे. तर भाजपला समर्थन देणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या गटांना हे पक्ष चिन्ह, निशाण आणि नाव देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग आणि न्यायपालिकेवर त्यांनी संशय व्यक्त केला. सर्व गोष्टी मोदींच्या इशाऱ्यावर होत असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानानं असं भडकवण्याचं काम केले नव्हते. तोडफोडीचे काम केले नव्हते, असा घणाघात त्यांनी केला.

ही लढाई जनता लढतेय

  1. देशातील अनेक घटनात्मक संस्था मोदींच्या इशाऱ्यावर चालतात. मोदी जे म्हणतात तेच होत आहे. पण या निवडणुकीत तसे होणार नाही. कारण जनतेची ही लढाई, जनता सुद्धा लढत असल्याचे खरेग म्हणाले. जनता जिंकणार आहे. भाजप सरकारच्या कारनाम्यावर जनता नाराज आहे. हे सरकार लोकशाहीच्या बाता मारते, पण त्यावर अंमल करत नाही. दोन वर्षांपासून महापालिका निवडणूक झाल्या नाहीत, हीच मोदींची लोकशाही असल्याचा टोला खरगे यांनी लगावला.
  2. मोदींची तोडफोड नीती केवळ महाराष्ट्रात झाली असे नाही. पहिला वार झाला कर्नाटकमध्ये, मणिपूर, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात याशिवाय इतर अनेक राज्यात हीच नीती राबविल्या जात आहे. त्याविरोधात इंडिया आघाडी जोरदारपणे लढत असल्याचे खरगे म्हणाले.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा