AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके यांच्याकडे पैसा कुठून आला? वडिलांच्या मालमत्तेबाबत चाैकशी, थेट पत्र..

कॉकरोच जनता पार्टी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनानंतर तूफान चर्चेत आहे. मोठे दावे केले जात आहेत. यादरम्यानच CJP ला मिळणाऱ्या विदेशी फंडिंगवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत आता एक याचिकाही दाखल करण्यात आली.

अभिजीत दिपके यांच्याकडे पैसा कुठून आला? वडिलांच्या मालमत्तेबाबत चाैकशी, थेट पत्र..
Abhijeet Dipke father
| Updated on: Aug 02, 2026 | 7:39 AM
Share

अभिजीत दिपके यांच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर काही गंभीर आरोप होत आहेत. विदेशातून या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरवठा करण्यात आल्याचे वारंवार म्हटले जात आहे. यादरम्यानच आता मोठी माहिती पुढे आली. गुजरातच्या सुरत येथील एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याने अभिजीत दिपके यांचे वडील आणि CJP साठी जाहीर करण्यात आलेला कायदेशीर बचाव निधी यांच्या मालमत्तेची आर्थिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी याबाबत बोलताना म्हटले की, मी या प्रकरणात निवडणूक आयोगाला यासोबतच केंद्रीय जीएसटी विभागाला पत्र दिले आहे. हे सर्व प्रकरण नीट पेपरफुटीविरोधातील प्रदर्शनाबद्दलचे आहे. CJP कार्यकर्त्यांना मिळणारी मदत आणि पैसे याबाबतचे आहे.

अमित तिवारी यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिक स्थितीची चौकशी करण्याची मागणी केली. अभिजीत दिपके वडील भगवानराव दिपके महाराष्ट्र सरकारचे निवृत्त कर्मचारी आहेत. तिवारी यांचा असा दावा आहे की, एक निवृत्त सरकारी कर्मचारी आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवतो.

याची सविस्तर चाैकशी व्हायला हवी. यासोबतच त्यांनी CJP काही गोष्टींवर त्यांना प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर CJP ला कायदेशीर बचावासाठी निधी म्हणून 1 कोटी रुपये दिले जात असतील तर लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 29-ए चे CJP कडून पालन केले जाते की नाही, याची निवडणूक आयोगाने तपासणी केली पाहिजे.

आता फक्त अभिजीत दिपकेच नाही तर त्यांच्या वडिलांचीही आर्थिक बाजू तपासली जाणार आहे, तशी मागणीही केली जात आहे. अभिजीत दिपके भाजपावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. हेच नाही तर त्यांनी भाजपाने आपल्याला त्यांच्या पक्षात येण्यासाठी मोठी ऑफर दिल्याचा दावाही केला. जंतर मंतरवर मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या मुद्द्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशाही मोठी मागणी अभिजीत दिपकेंनी केली. मुलींची डोके फोडण्यात आल्याेही त्यांनी म्हटले.

Follow Us
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड