AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांसोबत संवाद साधत असतानाच अभिजीत दिपकेंना मळमळ आणि उलट्या, प्रकृती खालावली, डॉक्टरांनी..

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्याबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येतंय. अचानक अभिजीत दिपके यांची तब्येत खालावली आहे. अभिजीत दिपकेंना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्याची माहिती आहे.

लोकांसोबत संवाद साधत असतानाच अभिजीत दिपकेंना मळमळ आणि उलट्या, प्रकृती खालावली, डॉक्टरांनी..
Abhijeet Dipke is unwel
| Updated on: Aug 01, 2026 | 1:38 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन जंतर मंतरवर केले. अमेरिकेतून भारतात दाखल होत अभिजीत दिपकेने मोठे आंदोलन उभारले. तब्बल काही दिवस आंदोलन सुरू होते. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. अखेर सरकारला आंदोलनांपुढे झुकावे लागले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, यादरम्यान अभिजीत दिपके यांची तब्येत खालावल्याचे बघायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या घरी परतले. खूप मोठे यश कॉकरोच जनता पार्टीला मिळाले. अभिजीत दिपके भाजपावर काही गंभीर आरोप करतानाही दिसले. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळाले. अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर अनेक लोक भेटीसाठी जात आहेत.

आता अभिजीत दिपके याच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट पुढे येताना दिसत आहे. अभिजीत दीपके यांची तब्येत खालावली आहे. भेटीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत असताना अभिजीत दीपके यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास  सुरू झाला. तब्येत बिघडल्याने त्यांनी भेट अर्धवट सोडली आणि उर्वरित नागरिकांना न भेटताच दिपके घरात परतले.

सध्या डॉक्टरांकडून अभिजीत दिपके यांच्यावर घरीच उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर अभिजीत दिपकेवर उपचार सुरू होते. त्यानंतर तब्येत सुधारली होती. पण आता अचानक अभिजीत दिपके यांची तब्येत खालावल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच नागरिकांसोबत संवाद साधत असताना पुन्हा तब्येत खालावली आहे.

संवाद अर्धवट सोडून घरात अभिजीत दिपके केले आहेत. आता अभिजीत दिपकेंवर उपचार सुरू असल्याची माहिती पुढे येतंय. अभिजीत दिपकेंकडून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. हेच नाही तर मला भाजपाकडून मोठी ऑफर पक्षात सहभागी होण्याची देण्यात आल्याचेही अभिजीत दिपकेने म्हटले. कॉकरोच जनता पार्टीला अगदी कमी कालावधीमध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली. सरकारविरोधात मोठा लढा अभिजीत दिपकेंच्या पार्टीने लढला आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा