AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कराची नौदलाच्या टप्प्यात! INS विक्रांतवर राफेल-M लढाऊ विमान तैनात, पाकिस्तानचे लटलटले पाय

INS Vikrant Rafale M: विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतवर लवकरच राफेल-M लढाऊ विमानं तैनात होतील. चीनच्या जीवावर उड्या मारणाऱ्या पाकिस्तानची त्यामुळे चिंता वाढली आहे. पाकिस्तानकडे सध्या चीनी बनावटीचे 36 J-10CE लढाऊ विमानं आहेत. तर भारतीय नौदलाकडे 26 राफेल-M आहेत.

कराची नौदलाच्या टप्प्यात! INS विक्रांतवर राफेल-M लढाऊ विमान तैनात, पाकिस्तानचे लटलटले पाय
INS विक्रांतवर राफेल-M तैनात
| Updated on: Aug 02, 2026 | 8:28 AM
Share

हिंद महासागरात भारताची लष्करी ताकद वाढली आहे. कराचीसह संपूर्ण पाकिस्तानी किनारपट्टी भारतीय नौदलाच्या टप्प्यात आहे. नौदलासाठी अत्याधुनिक राफेल -M (Rafale Marine) खरेदी करण्यात आलेली आहे. लवकरच हे अत्याधुनिक लढाऊ विमान विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतवर तैनात करण्यात येतील. या नवीन घडामोडींमुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत. समुद्रातील आव्हानं पेलणे शेजारील देशाला दिवसागणिक अवघड होत आहे. पाकिस्तानी संरक्षण तज्ज्ञानुसार, विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर राफेल-M राफेल तैनात झाल्यावर भारतीय नौदलाची मारक क्षमता कित्येकपटीने वाढले. चीनच्या जीवावर उड्या मारणाऱ्या पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

चीनी बनावटीचे J-10 CE ठरणार फुस्स

पाकिस्तानने त्यांच्या नौदलात गेल्या काही वर्षात चीनकडून खरेदी केलेल्या J-10CE मल्टिरोल लढाऊ विमानांचा भरणा केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागानुसार पाकिस्तान वायुदलाकडे असे 36 लढाऊ विमान आहेत. भारताने 2025 मध्ये फ्रान्सकडून नौसेनेसाठी 26 राफेल-M लढाऊ विमानांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. विमानवाहू नौकांवरून होणाऱ्या कारवाया आणि नौदल युद्धासाठी ती तयार करण्यात आली आहेत.

पाकिस्तानच्या संरक्षण तज्ज्ञानुसार भारताने खरेदी केलेली राफेल -M ही लढाऊ विमानांची फळी चीनच्या J-10CE मल्टिरोल लढाऊ विमानांपेक्षा कित्येक पटीने सरस, प्रगत आहे. विमानातील तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रे आणि नेटवर्क केंद्रित युद्धक्षमता या विमानांची जमेची बाजू आहे. सामरिक हालचालींसाठी आणि पुढील घडामोडींसाठी ही विमानं ताफ्यात असणं अर्धी लढाई जिंकल्यासारखं असल्याचा पाकिस्तानी तज्ज्ञांचा दावा आहे.

फायटर जेटच नाही तर ही आहे भारताची ताकद

संरक्षण तज्ज्ञानुसार, भारताची खरी ताकद ही केवळ 4.5 पिढीतील राफेल-M नाही तर त्यासोबत असणारा कॅरियर स्ट्राईक ग्रुप (CSG) आहे. या गटात आधुनिक डेस्ट्रॉयर, फ्रिगेट, पाणबुडी, फ्लीट सपोर्ट शिप, लांबपल्ल्याचे रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम आणि अनेकस्तरीय एअर डिफेन्स नेटवर्क यांचा समावेश असतो. विशाखापटण्णम क्लास आणि कोलकत्ता क्लास या अत्याधुनिक विध्वंसक प्रणाली या युद्ध नौकाचे संरक्षण करतात. एअर डिफेन्स सिस्टिम दूरनच शत्रू राष्ट्रांचे लढाऊ विमान, ड्रोन आणि अंटी शिप मिसाईल हेरते आणि त्यावर थेट अचूक मारा करते.  त्यातच राफेल-M आयएनएस विक्रांतवर आरूढ होणार असल्याने कराचीसह पाकिस्तानचा किनारपट्टा भारताच्या अगदी समीप आला आहे. या नवीन घडामोडींमुळे शत्रू देशाची चिंता वाढली आहे.  पाकिस्तानला पुन्हा आगळीक करणे सोपे राहिलेले नाही.

Follow Us
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड