IPL 2024 Points Table: आरसीबीने गुजरात-पंजाब आणि मुंबई इंडियन्सला दिली मात, गुणतालिकेत पाहा काय झालं

आयपीएल 2024 स्पर्धेतून मुंबई इंडियन्सचा पत्ता साफ झाला आहे. आता तीन सामन्यांची औपचारिकता राहिली आहे. तर गुणतालिकेत आरसीबीनेही मुंबई इंडियन्सला मात दिली आहे. गुजरात विरुद्धचा सामना जिंकत आरसीबीचे आता 8 गुण झाले आहेत. इतकंच काय तर नेट रनरेटही सुधारला आहे.

IPL 2024 Points Table: आरसीबीने गुजरात-पंजाब आणि मुंबई इंडियन्सला दिली मात, गुणतालिकेत पाहा काय झालं
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 11:03 PM

आयपीएल स्पर्धेतली 52 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 6 गडी राखून जिंकला. यासह गुणतालिकेत गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सला धोबीपछाड दिला आहे. या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सर्वात शेवटच्या स्थानावर होता. मात्र पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्सला मात देत थेट सातव्या स्थानावर झेप घेतली. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या प्लेऑफच्या आशा अजूनही कायम आहेत. उर्वरित तीन सामन्यात विजयासह नेट रनरेट चांगला ठेवला आणि जर तरच गणित जुळून आलं तर प्लेऑफचं गणित सुटू शकतं.

राजस्थान रॉयल्स संघ 16 गुण आणि 0.622 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तसेच प्लेऑफमधील स्थान पक्कं झालं आहे. कोलकाता नाईट रायडर्स 14 गुण आणि 1.098 दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच एक विजय मिळवताच प्लेऑफमध्ये पोहोचेल. लखनौ सुपर जायंट्स 12 गुण आणि 0.094 नेटरनरेट आहे. काहीही करून दोन सामन्यात विजय मिळवावा लागेल. अशीच काहीशी स्थिती सनरायझर्स हैदराबादची आहे. सनरायझर्स हैदराबाद 12 गुण आणी 0.072 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे. चेन्नई सुपर किंग्स 10 गुण आणि 0.627 नेट रनरेटसह पाचव्या, दिल्ली कॅपिटल्स 10 गुण आणि -0.442 नेट रनरेटसह सहाव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 8 गुण आणि -0.049 नेट रनरेटसह सातव्या स्थानी आहे. पंजाब किंग्स 8 गुण आणि -0.062 नेट रनरेटसह आठव्या, तर गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.320 नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.356 एकदम शेवटच्या स्थानावर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स

आयपीएल स्पर्धेतील 52वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून बंगळुरुने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच गुजरात टायटन्सला 147 धावांवर रोखलं. विजयासाठी मिळालेल 148 धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 6 गडी गमवून पूर्ण केलं. बंगळुरुने धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली केली होती. मात्र मधल्या फळीत विकेट्सची रांग लागली. जोशुआ लिटलने एका मागोमाग धक्के दिले. त्यामुळे आरसीबी बॅकफूटवर आली होती. मात्र दिनेश कार्तिकने पुन्हा डाव सारवला आणि विजय मिळवून दिला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार विशक.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा, जोशुआ लिटल

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.