RCB vs GT : आरसीबी विरुद्ध सलग दुसरा पराभव, गुजरातच्या पराभवानंतर गिलने सर्वच सांगून टाकलं

RCB vs GT Shubman Gill Post Match Presentation : गुजरातला आरसीबी विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. गुजरातच्या पराभवानंतर कॅप्टन शुबमन गिलने सर्वच स्पष्ट सांगितलं.

RCB vs GT : आरसीबी विरुद्ध सलग दुसरा पराभव, गुजरातच्या पराभवानंतर गिलने सर्वच सांगून टाकलं
shubman gill rcb vs gt ipl 2024,Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 11:37 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सवर आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 52 व्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळववा. गुजरातने आरसीबीला विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 38 बॉलआधी पूर्ण केलं. आरसीबीने 6 विकेट्स गमावून 13.4 ओव्हरमध्ये 152 धावा केल्या. आरसीबीसाठी कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. तर विराट कोहली याने 27 बॉलमध्ये 42 रन्स केल्या.

आरसीबीचा हा या हंगामातील एकूण चौथा सलग तिसरा विजय ठरला. तसेच आरसीबीने गुजरातला सलग दुसऱ्यांदा पराभूत करत विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. तर दुसऱ्या बाजूला गुजरातचं या पराभवामुळे टेन्शन वाढलंय. आता प्लेऑफच्या हिशोबाने गुजरातला उर्वरित सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. दरम्यान गुजरातच्या या पराभवानंतर नक्की कुठे चुकलं याबाबत कॅप्टन शुबमन गिल याने काय म्हटलं हे जाणून घेऊयात.

शुबमन गिल काय म्हणाला?

“सर्व काही विकेट्सवर (खेळपट्टी) अवलंबून असतं तुम्ही पहिल्या 2 ओव्हर्स पाहा. तुम्हाला एक कल्पना येते आणि तुम्ही त्यानुसार खेळता”, असं शुबमनने म्हटलं.

“या विकेटवर 170-180 ही चांगला स्कोअर ठरला असता. आम्ही पॉवरप्लेमध्ये कशी बॅटिंग केली आणि पॉवरप्लेमध्ये आम्ही कशी बॉलिंग केली, त्यामुळे फरक पडला. आता आमच्यासाठी पुढील सामन्यांमध्ये शून्यापासून सुरुवात करणे महत्त्वाचे आहे, पुढे जाणं आवश्यक आहे. या खेळातून अनेक सकारात्मक गोष्टी घ्यायच्या आहेत. आम्ही आमच्या चुका पुन्हा करणार नाही. इथून पुढे आम्ही जे काही करू शकतो ते जिंकण्यासाठी करु”, असं शुबमनने नमूद केलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल आणि विजयकुमार वैशाक.

गुजरात टायटन्स लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धीमान साहा, साई सुधारसन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.