AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs LSG : लखनऊनला राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी रोखलं, जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान

Rajasthan Royals vs Lucknow Super Giants IPL 2023 Live Score in Marathi : लखनऊ संघाच्या बॅटर्सना राजस्थानच्या गोलंदाजांनी रोखलं.

RR vs LSG : लखनऊनला राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी रोखलं, जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान
| Updated on: Apr 19, 2023 | 9:56 PM
Share

मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना 154 धावा केल्या आहेत. लखनऊ संघाकडून सलामीवीर काइल मेयर्सने सर्वाधिक 51 धावा तर के.एल. राहुल याने 39 धावा केल्या. शेवटला येत निकोलस पूरन 29 आणि स्टोइनिसने 21 धावा करत संघाला 150 धावांचा टप्पा पार करून दिला.

लखनऊ संघाने एकदम सावध सुरूवात केली होती.  राहुल आणि मेयर्स दोघेही मैदानावर तग धरून राहिले होते.  कर्णधार के.एल. राहुलला 11 व्या ओव्हरमध्ये जेसन होल्डरने बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर  बदोनीला बोल्टने बाद करत दुसरा धक्का दिला. त्यानंतर मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन यांनी शेवटला फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं.

राजस्थानकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 2, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या. राजस्थानला दिलेल्या लक्ष्याच्या आतमध्ये रोखत पहिला विजय मिळवण्याचा लखनऊचा प्रयत्न असणार आहे.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (W), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, आवेश खान, युधवीर सिंग चरक, रवी बिश्नोई

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.