AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs RCB Live Score, IPL 2021 : ग्लेन मॅक्सवेलचं धमाकेदार अर्धशतक, आरसीबीचा राजस्थानवर 7 विकेट्सनी विजय

| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 11:26 PM
Share

RR vs RCB Live Score in Marathi : प्लेऑफच्या सामन्यांमध्ये आपल्या संघाला नेण्यासाठी विराट आणि संजू आपआपल्यापरीने सर्व प्रयत्न केले आहेत. दरम्यान सामन्यात आरसीबी विजयी झाला.

RR vs RCB Live Score, IPL 2021 : ग्लेन मॅक्सवेलचं धमाकेदार अर्धशतक, आरसीबीचा राजस्थानवर 7 विकेट्सनी विजय
आरसीबी संघाकडून धमाकेदार खेळी

आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील 43 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु या दोन संघामध्ये खेळवला गेला. हळूहळू आयपीएलच्या प्लेऑफचे चित्र स्पष्ट होत असल्याने आजचा सामनाही प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी दोन्ही संघाना महत्त्वाचा होता.

सामन्यात नाणेफेक जिंकत विराट कोहलीने गोलंदाजी निवडली. सुरुवातीला राजस्थानच्या फलंदाजानी उत्तम कामगिरी केली. सलामीवीर एविन लुईस (58) आणि यशस्वी जैस्वाल (31) यांच्याशिवाय कोणत्याच खेळाडूला खास कामगिरी न करता आल्याने राजस्थानने केवळ 149 रन केले आहेत. आता 150 धावा करुन सामना जिंकण्यासाठी कोहलीची टोळी मैदानात उतरली. आरसीबीकडून आधी यष्टीरक्षक भरतने (44) विराटसोबत (25) मिळून डाव सावरला. ज्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 30 चेंडूत 50 धावा करत अर्धशतकासोबत संघाला 7 गडी राखूीन विजयही मिळवून दिला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Sep 2021 11:04 PM (IST)

    RR vs RCB : आरसीबी विजयी!

    विराटच्या आरसीबी संघाने आणखी एक दमदार विजय मिळवला आहे. सात गडी राखून त्यांनी राजस्थानवर विजय मिळवला.

  • 29 Sep 2021 11:00 PM (IST)

    RR vs RCB : मॅक्सवेलंच अर्धशतक

    ग्लेन मॅक्सवेलंन धमाकेदार अर्धशतक ठोकलं आहे. त्याने केवळ 30 चेंडूत 50 धावा केल्या.

  • 29 Sep 2021 10:53 PM (IST)

    RR vs RCB : भरतचं अर्धशतक हुकलं

    आरसीबीकडून एकहाती झुंज देणारा यष्टीरक्षक भरत 44 धावांवर बाद झाला आहे. मुस्तफिजूरने त्याची विकेट घेतली आहे. आता आरसीबीला 24 चेंडूत 23 धावांची गरज आहे.

  • 29 Sep 2021 10:12 PM (IST)

    RR vs RCB : रियानच्या हिटवर विराट बाद

    नुकताच एक झेल सोडल्यानंतर रियान परागने अप्रतिम डायरेक्ट हीट करत आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला धावचीत केलं आहे.

  • 29 Sep 2021 10:04 PM (IST)

    RR vs RCB : आरसीबीचा पहिला गडी बाद

    आरसीबी संघाकडून सलामीवीर विराट आणि देवदत्त यांनी उत्तम सुरुवात केल्यानंतर संघाच्या 48 धावा झाल्या असताना देवदत्त बाद झाला आहे. मुस्तफिजूरने त्याची विकेट घेतली आहे.

  • 29 Sep 2021 09:25 PM (IST)

    RR vs RCB : आरसीबीला 150 धावांचे आव्हान

    अखेरच्या षटकात हर्षलने तीन विकेट्स घेत राजस्थान संघाला 149 धावांवर रोखलं. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी 150 धावांची गरज आहे.

  • 29 Sep 2021 09:18 PM (IST)

    RR vs RCB : हर्षलला पुन्हा लागोपाठ दोन विकेट्स

    हर्षलने रियान पाठोपाठ ख्रिस मॉरिसलाही बाद केलं आहे. देवदत्त पडीक्कलने त्याचा झेल घेतला आहे.

  • 29 Sep 2021 09:17 PM (IST)

    RR vs RCB : रियान परागही बाद

    राजस्थानचा आठवा गडी रियान परागच्या रुपात बाद झाला आहे. हर्षल पटेलच्या चेंडूवर विराट कोहलीने त्याचा झेल घेतले आहे.

  • 29 Sep 2021 09:02 PM (IST)

    RR vs RCB : राजस्थानची सातवी विकेट पडली

    राजस्थानचा सातवा गडी लियम लिव्हिंगस्टन चहलच्या चेंडूवर बाद झाला आहे. डिव्हीलीयर्सने त्याची कॅच घेतली आहे.

  • 29 Sep 2021 08:52 PM (IST)

    RR vs RCB : राहुल तेवतियाही बाद

    संजू बाद झालेल्या षटकातच शाहबाजने राहुल तेवतियाचा विकेटही घेतला आहे. पडीक्कलनेच त्याचा झेल घेतला आहे.

  • 29 Sep 2021 08:49 PM (IST)

    RR vs RCB : संजू सॅमसन बाद

    राजस्थान रॉयल्स संघाला मोठा झटका बसला आहे. कर्णधार संजू सॅमसन केवळ 19 धावा करुन बाद झाला आहे. शाहबाज अहमदच्या चेंडूवर देवदत्त पडीक्कलने त्याचा झेल घेतला आहे.

  • 29 Sep 2021 08:41 PM (IST)

    RR vs RCB : चहलने घेतली महिपालची विकेट

    आरसीबीचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने राजस्थानचा महिपाल लोमरोरला 3 धावांवर बाद केलं आहे.

  • 29 Sep 2021 08:32 PM (IST)

    RR vs RCB : एविन लुईस बाद

    जबरदस्त अर्धशतक ठोकल्यानंतर एविन लुईस बाद झाला आहे. डेब्यू करणारा खेळाडू गार्टनच्या चेंडूवर यष्टीरक्षक भरतने त्याचा झेल घेतला आहे.

  • 29 Sep 2021 08:22 PM (IST)

    RR vs RCB : एविन लुईसचं जबरदस्त अर्धशतक

    राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर एविन लुईसने 31 चेंडूत 51 धावा ठोकत अर्धशतक ठोकलं आहे. त्याने लागोपाठ दोन चौकार लगावले आहेत.

  • 29 Sep 2021 08:16 PM (IST)

    RR vs RCB : यशस्वी जैस्वाल बाद

    संघाला दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल 31 धावा करुन बाद झाला आहे.

  • 29 Sep 2021 07:58 PM (IST)

    RR vs RCB : राजस्थानकडून दमदार सुरुवात

    राजस्थान रॉयल्सने  दमदार फलंदाजीने सामन्याची सुरुवात केली आहे. सलामीवीर यशस्वी आण लुईस धमाकेदार फलंदाजी करत आहेत. 5 षटकानंतर लुईसने 19 चेंडूत 39 धावा केल्या असून यशस्वीने 13 धावांची खेळी आतापर्यंत केली आहे.

  • 29 Sep 2021 07:40 PM (IST)

    RR vs RCB : यशस्वीकडून सामन्यातील पहिला चौैकार

    राजस्थानने फलंदाजीला सुरुवात केली असून सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि एविन लुईस मैदानात आले आहेत. नुकताच यशस्वीने दुसऱ्या षटकात पहिला चौकार खेचत त्याचं खातं खोललं आहे.

  • 29 Sep 2021 07:10 PM (IST)

    RR vs RCB : विराटने निवडली गोलंदाजी

    नाणेफेक जिंकत आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

  • 29 Sep 2021 07:08 PM (IST)

    RCB कडून नव्या खेळाडूचे पदार्पण

    इंग्लंडचा खेळाडू जॉर्ज गार्टन हा आज RCB संघाकडून आयपीएलमध्ये डेब्यू करत आहे.

  • 29 Sep 2021 07:07 PM (IST)

    राजस्थान रॉयल्सचे अंतिम 11

    संजू सॅमसन(कर्णधार आणि यष्टीरक्षक), एविन लुईस, यशस्वी जैस्वाल, डेविड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवतिया, माहिपार लोमरोर, रियान पराग, कार्तिक त्यागी, मुस्तफिजूर रेहमान, चेतन सकारीया

  • 29 Sep 2021 07:06 PM (IST)

    आरसीबीचे अंतिम 11

    विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलीयर्स, डॅनियल ख्रिस्टियन, शेहबाद अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

  • 29 Sep 2021 07:04 PM (IST)

    दोन्ही संघाचे शेवटचे सामने

    राजस्थानला आजचा सामना जिंकण फार महत्त्वाचं आहे. पण आरसीबी संघाचा फॉर्म सध्या कमालीचा आहे. त्यांनी याआधीच्या सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सला 54 धावांनी पराभूत केलं. तर राजस्थान रॉयल्सचा संघ सनरायजर्स हैद्राबादकडून 7 विकेटने पराभूत होऊन आला आहे.

Published On - Sep 29,2021 7:02 PM

Follow us
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.