गंभीर-श्रीसंथ वादात आता गोलंदाजाच्या पत्नीची उडी, गंभीरची लाजच काढली

लेजेंड्स लीग क्रिकेट सामन्यादरम्यान गंभीर आणि श्रीशांत यांच्यातील संघर्ष थांबत नाही आहे. गंभीर आणि श्रीसंथ यांच्यातील वादावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आता श्रीसंथच्या पत्नीने गौतम गंभीरवर जोरदार टीका केली आहे.

गंभीर-श्रीसंथ वादात आता गोलंदाजाच्या पत्नीची उडी, गंभीरची लाजच काढली
gambhir vs shreesanth
| Updated on: Dec 07, 2023 | 9:26 PM

Sreesanth vs Gambhir :  लेजेंड्स लीग क्रिकेट सामन्यादरम्यान गंभीर आणि श्रीसंथ यांच्यातील संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.  गंभीर आणि श्रीसंथ यांच्यातील वादावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आता या लढ्यात श्रीसंथची पत्नी भुवनेश्वरीनेही उडी घेतली आहे. श्रीसंतचे समर्थन करताना तिने गंभीरवर टीका केली आहे.

गंभीर आणि श्रीशांतच्या लढतीवर, माजी वेगवान गोलंदाजाची पत्नी भुवनेश्वरीने सोशल मीडियावर लिहिले की, “श्रीकडून ऐकणे खूप धक्कादायक आहे की एक खेळाडू जो अनेक वर्षे भारतासाठी त्याच्यासोबत खेळला. तो या पातळीवर जाऊ शकतो. शेवटी, पालकत्व खूप महत्त्वाचे असते आणि जेव्हा या प्रकारची वागणूक मैदानावर समोर येते तेव्हा हे दिसून येते.

श्रीसंथचे गंभीर आरोप

माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंथने गुरुवारी त्याचा सहकारी गौतम गंभीरवर मोठा आरोप केला आहे. श्रीसंथने गुरुवारी इंस्टाग्रामवर लाइव्ह करत म्हणाला की, लाइव्ह टीव्हीवर गौतम मला ‘फिक्सर फिक्सर’ म्हणत राहिला, तू फिक्सर आहेस. मी फक्त म्हणालो, काय म्हणतोयस. तो विनोदाने हसत राहिला. पंच त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असताना तोही त्यांच्याशी त्याच भाषेत बोलला. मी कोणतेही अपशब्द वापरले नाहीत.

गौतम गंभीरनेची प्रतिक्रिया

त्याचवेळी भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने त्याच्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर हसणारा फोटो शेअर केला आहे. यावेळी त्याने कॅप्शन दिले की, “हसा, जेव्हा जगाचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित करायचे असते.’