SA vs NZ : खुल्लम खुल्ला चिटींग;कॅप्टन मार्करम चुकीच्या निर्णयाचा बळी! OUT की Not Out?

Aiden Markram Controversial Dismissal : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने टीम अडचणीत असताना काही वेळ चिवट खेळी केली. मात्र थर्ड अंपायच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं.

SA vs NZ : खुल्लम खुल्ला चिटींग;कॅप्टन मार्करम चुकीच्या निर्णयाचा बळी! OUT की Not Out?
Aiden Markram controversial dismissal
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 04, 2026 | 10:50 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात एका निर्णयामुळे वादाला तोंड फुटलं आहे. न्यूझीलंडने कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र या दरम्यान अंपायरने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याला आऊट देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. एडनला थर्ड अंपायरने आऊट असल्याचं जाहीर केलं. मात्र न्यूझीलंडच्या खेळाडूने एडनचा कॅच पूर्णपणे घेतला नसल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या निमित्ताने नक्की काय झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी

दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडसमोर चांगली सुरुवात करता आली नाही. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला झटपट 2 झटके दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 2 आऊट 12 अशी स्थिती झाली. झटपट विकेट गमावल्याने दक्षिण आफ्रिका अडचणीत सापडली होती. त्यानंतर कर्णधार एडनने डेव्हिड मिलर याच्यासह डाव सावरला आणि दक्षिण आफ्रिकेला 50 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र त्यानंतर जे झालं ते साऱ्या क्रिकेट चाहत्यांनी पाहिलं.

एडन मार्करम चुकीच्या पद्धतीने आऊट?

एडन मार्करम याला दक्षिण आफ्रिकेच्या डावातील आठव्या ओव्हरमध्ये आऊट देण्यात आलं. न्यूझीलंडचा रचीन रवींद्र आठवी ओव्हर टाकत होता. तेव्हा एडनने मोठा फटका मारला. मार्करमने मारलेला फटका लाँग ऑनच्या दिशेने गेला. तिथे डॅरेल मिचेल होता. मिचेलने बॉलचा अंदाज घेत उडी मारत कॅच घेतला. मात्र मिचेलने सुरक्षितपणे कॅच घेतला नसल्याचं प्रथमदर्शनी वाटत आहे. मिचेलने कॅच घेतला तेव्हा बॉलचा काही भाग जमिनीला स्पर्श झाल्याचं दिसत आहे. मिचेललाही कॅच सुरक्षितपणे घेतल्याचं निश्चित नव्हतं. त्यामुळे फिल्ड अंपायरने थर्ड अंपायर निर्णय देणार असल्याचा इशारा केला. त्यामुळे आता थर्ड अंपायर काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं.

थर्ड अंपायरच्या भूमिकेत नितीन मेनन होते. नितीन मेनन अचूक निर्णयांसाठी ओळखले जातात. मेनन यांनी मिचेल याने घेतलेल्या कॅचचा व्हीडिओ 3-4 वेळा गरजेनुसार पाहिला. आता नितीन मेनन काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मेनन यांनी मोठ्या स्क्रीनवर एडन आऊट असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे एडनसह दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांनाही हा मोठा झटका होता. एडनला आऊट देण्यावरुन आता सोशल मीडियावर अनेक मतमतांतरे पाहायला मिळत आहेत.

दरम्यान या वादग्रस्त निर्णयामुळे एडनच्या खेळीचा शेवट झाला. एडनने उपांत्य फेरीतील सामन्यात 18 चेंडूंचा सामना केला. एडनने 18 बॉलमध्ये 20 रन्स केल्या. एडनने या खेळीत 1 चौकार आणि 1 षटकार लगावला.

Follow Us