AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आफ्रिकेच्या खेळाडूंनी IPLसाठी पाकिस्तानविरुद्धची मालिका अर्धवट सोडली, शाहिद आफ्रिदी भडकला, म्हणतो…

आफ्रिकेच्या खेळाडूंनी IPLसाठी पाकिस्तानविरुद्धची मालिका अर्धवट सोडल्याने पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शाहिद आफ्रिदी भडकला. Shahid Afridi Disappointed South Africa Player leave ODI Series over IPL 2021

आफ्रिकेच्या खेळाडूंनी IPLसाठी पाकिस्तानविरुद्धची मालिका अर्धवट सोडली, शाहिद आफ्रिदी भडकला, म्हणतो...
आफ्रिकेच्या खेळाडूंनी IPLसाठी पाकिस्तानविरुद्धची मालिका अर्धवट सोडल्याने आफ्रिदी भडकला...
| Updated on: Apr 08, 2021 | 4:20 PM
Share

नवी दिल्ली :  आयपीएलचा (IPL 2021) श्रीगणेशा उद्यापासून म्हणजेच 9 एप्रिलपासून होत आहे. त्याअगोदर विदेशी खेळाडू आपापल्या फ्रेंचायजींना जॉईन झाले आहेत. काही खेळाडूंनी आपापल्या देशांच्या क्रिकेट मालिका त्यासाठी अर्धवट सोडल्या आहेत. आफ्रिकेच्या (South Africa Player) काही खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धची (Sa vs Pak Series) एकदिवसीय मालिका अर्धवट सोडल्याने पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Africa) चांगलाच भडकला. आफ्रिकन बोर्डाने पाकविरुद्धची मालिका अशी अर्धवट सोडायला परवानगी दिलीच कशी?, असा सवाल त्याने विचारला आहे. (Sa vs pak Shahid Afridi Disappointed South Africa Player leave ODI Series over IPL 2021)

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएलसाठी भारतात दाखल

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होती. या मालिकेच्या दुसर्‍या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या काही खेळाडूंनी आयपीएल खेळण्यासाठी पाकविरुद्धची मालिका सोडली आणि ते भारतासाठी रवाना झाले. आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉक, वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि एनिच नॉर्टजे दुसर्‍या वनडेनंतर भारतात दाखल झाले आहेत.

खेळाडूंना परवानगी दिलीच कशी..?

इतकंच नव्हे तर इंग्लंड संघातील अनेक खेळाडूंनी आयपीएलसाठी आपल्या देशाकडून खेळणेही सोडू शकतो, असंही म्हटलं आहे. खेळाडूंच्या याच वर्तनावर शाहिद आफ्रिद भडकला आहे. आफ्रिकन बोर्डाने पाकविरुद्धची मालिका अशी अर्धवट सोडायला त्यांच्या खेळाडूंना परवानगी दिलीच कशी?, असा सवाल त्याने विचारला आहे.

‘…हे पाहून मला वाईट वाटतं’

आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर टी-20 लीगचा परिणाम होतोय हे पाहून मला वाईट वाटतं… दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने मालिका अर्धवट सोडून खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली कशी याचं मला कोडं आहे. याबाबत मंडळाने पुन्हा विचार करण्याची गरज आहे, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला.

आयपीएलचं रण सज्ज, पहिला सामना 9 तारखेला

इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक  निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल (IPL 2021) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.

(Sa vs pak Shahid Afridi Disappointed South Africa Player leave ODI Series over IPL 2021)

हे ही वाचा :

IPL 2021 : आरसीबीसाठी धोक्याची घंटा, एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार मारणारा पोलार्डचा पुन्हा धुमाकूळ, मुंबईकडून Video शेअर

हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचा स्विमिंगपूलमधला हॉट अवतार, चाहते म्हणतात, ‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती!’

IPL 2021 : उसेन बोल्टचा RCB ची जर्सी परिधान करत विराट कोहलीला खास मेसेज, म्हणतो, ‘लक्षात ठेवा…’

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.