तो आऊट झाला अन् मला प्रश्न पडला….श्रीलंकन क्रिकेटपटूच्या हिट विकेटमुळे खळबळ, व्हिडिओ व्हायरल
क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर नजर असते. त्यामुळे कधी काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. श्रीलंकेचा खेळाडू ज्या पद्धतीने आऊट झाला आहे ते पाहून दिग्गजाने प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला?

श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी20 मालिका खेळवली गेली. या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यामध्ये वानिंदू हसरंगा आश्चर्यकारकरित्या आऊट झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच्या आऊट होण्याच्या पद्धतीला पाहून सोशल मीडियावर मोठं वादळ उठलं आहे. अनेक क्रिकेट विश्लेषकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. 19 सप्टेंबर रोजी खेळवलल्या गेलेल्या या सामन्यामध्ये ब्रिटिश गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना वानिंदू हसरंगा फसला आणि त्याची विकेट गेली. नेमकं काय घडलं? आणि या सगळ्यावर लंकेच्या क्रिकेट विश्लेषकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घेऊयात.
तर हसरंगा मोठा फटका खेळायला गेला आणि त्याचा बॉल मिस झाला. त्यानंतर त्याची बॅट फिरुन मागे असलेल्या स्टंपला लागली. स्टंपच्या कडा खाली कोसळताच हसरंगाला आऊट म्हणून घोषित करण्यात आलं. सुरुवातीला गोलंदाज जोफ्राला याबद्दल काहीच कळलं नाही. पण याप्रकारामुळे हसरंगाला केवळ 7 धावांच करता आल्या. त्यानंतर त्याचा संघ श्रीलंकाही केवळ 124 धावांत आटोपली.
दरम्यान, हसरंगाच्या या विकेटवर लंकेचे क्रिकेट विश्लेषक रेक्स क्लेमेंटाइन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मला सुरुवातीला बघून वाटलं की ही एक सामान्य घटना आहे. म्हणजे मॅचमध्ये अशा गोष्टी घडत असतात पण कालांतराने माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.
He won’t have taken many wickets like this 🤣 pic.twitter.com/WGSHUV8CJf
— England Cricket (@englandcricket) September 19, 2026
या सामन्यामध्ये लंकेने दिलेलं 124 धावांचं आव्हान इंग्लंडने फक्त 9.4 ओव्हरमध्येच पूर्ण करुन टाकलं. जोस बटलरने 32मध्ये 62 धावा ठोकत टीमला 8 विकेट्सनी जिंकवलं. कर्णधार हॅरी ब्रूकनेही 33 धावांचं योगदान दिलं. बटल आणि ब्रूक या दोघांनी 85 धावांची भागीदारी उभी केली. इंग्लंडने पॉवरप्लेमध्येच 82 धावा केल्या. त्यानंतर धेय्य गाठण्यासाठी त्यांना जास्त मेहनत करण्याची आवश्यकता भासली नाही. या विजयासह इंग्लंडने तीन मॅचच्या या सीरिजमध्ये 3-0ने क्लीन स्वीप केलं आहे.
दरम्यान, एवढच नाही तर हा टी20 इंटरनॅशनल मधील इंग्लंडचा श्रीलंकेविररुद्ध सलग 15 वा विजय ठरला. या विजयामुळे इंग्लंडचा संघ हा रँकिंगमध्येही वर म्हणजे क्रमांक एकवर पोहोचला आहे.