IND vs NZ Final : सँटनरने पॅट कमिन्ससारखीच चिथावणी देत मीठ चोळलं, टीम इंडियाला दिला इशारा

T20 World Cup 2026 Final: टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद फक्त एक विजय दूर आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना जेतेपदाची संधी आहे. असं असताना न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने मोठं विधान करत भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं.

IND vs NZ Final : सँटनरने पॅट कमिन्ससारखीच चिथावणी देत मीठ चोळलं, टीम इंडियाला दिला इशारा
IND vs NZ Final : सँटनरने पॅट कमिन्ससारखीच चिथावणी देत मीठ चोळलं, टीम इंडियाला दिला इशारा
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 07, 2026 | 3:53 PM

India vs New Zealand Final: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. हा सामना 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने चिथावणी दिली आहे. त्याच्या वक्तव्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे. जेतेपद मिळवण्यासाठी न्यूझीलंडचा संघ पूर्ण तयार असल्याचं सांगत त्याने भारतीय संघाला डिवचलं आहे. जेतेपदाची नशा सँटनरमध्ये इतकी भिनली आहे की यासाठी कोणाची मनं दुखावली तर पर्वा नसल्याचं सांगितलं आहे. या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सँटनरने सांगितलं की, जर कोणाचं मन दुखावलं तरी आम्ही काही फरक पडत नाही. या सामन्याचा विपरीत निकाल लागला तर भारतीयांची मनं दुखावणार हे सहाजिकच आहे.

मिचेल सँटनरने अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, आम्हाला असं कुठेच वाटत नाही की आम्ही जेतेपद मिळवणार नाही. जेतेपद मिळवण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आमच्या संघाने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे. जर आम्ही काही गोष्टी दुरूस्त केल्या तर आम्ही जेतेपद मिळवण्याच्या शर्यतीत पुढे आहोत. असं सांगितल्यानंतर सँटनरने भारतीयांच मन दुखवणारा विधान केलं. त्याने सांगितलं की, जेतेपदासाठी कोणाचं मन दुखावलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. मिचेल सँटनरच्या या वक्तव्याने भारतीयांची जखम ओली झाली आहे. कारण 2023 वनडे वर्ल्डकप सामन्यापूर्वी पॅट कमिन्सने असंच विधान केलं होतं. तेव्हा त्याने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतीय प्रेक्षकांना गप्प करू असं सांगितलं होतं. तेव्हा काय घडलं हे नव्याने सांगायची गरज नाही.

इतकंच काय तर सँटनरने पॅट कमिन्सच्या कृतीचं तंतोतंत पालन केलं. त्याने पॅट कमिन्ससारखंच खेळपट्टीचे फोटो काढले आहेत. तसेच कोणाला तरी पाठवून या खेळपट्टीचा अंदाज घेण्यास सांगितलं आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर भारताला धोबीपछाड देण्यास मदत होईल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाचा असणार आहे. 2023 वनडे वर्ल्डकप अंतिम सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला होता. तेव्हा भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली होती. आता काय होते आणि निकाल कसा लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Follow Us