AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : इरफान पठाण याची वर्ल्ड कपच्या फायनल 4 संघांबाबत भविष्यवाणी, म्हणाला…

World Cup 2023 : भारत-ऑस्ट्रेलिया मालिका भारतीय खेळाडूंनी खिशात घातली आहे. अशातच आजी-माजी खेळाडू भविष्यावाणी करत आहेत. अशातच माजी खेळाडू इरफान पठान याने सेमी फायनलमधील चार संघांची नाव सांगितली आहेत.

World Cup 2023 : इरफान पठाण याची वर्ल्ड कपच्या फायनल 4 संघांबाबत भविष्यवाणी, म्हणाला...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 26, 2023 | 4:18 PM
Share

मुंबई : यंदाच्या वर्ल्ड कप 2023 वर सर्वांच्या नजरा लागून आहेत. भारताकडे वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद असल्याने भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. घरच्या मैदानावर वर्ल्ड कप असल्याने भारतीय खेळाडूसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये दिसले. आता सुरू असलेली भारत-ऑस्ट्रेलिया मालिका भारतीय खेळाडूंनी खिशात घातली आहे. अशातच आजी-माजी खेळाडू भविष्यावाणी करत आहेत. अशातच माजी खेळाडू इरफान पठान याने सेमी फायनलमधील चार संघांची नाव सांगितली आहेत.

 कोणते आहेत ते चार संघ?

5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये दहा संघ एकमेकांना भिडणार आहेत. भारतात वर्ल्डकपमध्ये असल्याने भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. इरफान पठाण याच्या मते सेमी फायनलमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे चार संघ धडक मारणार आहेत. चारही संघ तोडीस तोड आहेत.

भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार असून 8 ऑक्टोबरला पार पडणार आहे.  तर वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड वि. न्यूझीलंड यांच्यात पार पडणार असून थराराला सुरूवात होणार आहे. बीसीसीआयनेही जय्यत तयारी केली आहे. देशभरातील सर्व नामांकित स्टेडिअममध्ये सामने होणार आहेत. मात्र यंदाच्या वर्ल्ड कप सामन्यांवर पावसाचं सावट असणार आहे.

दरम्यान, इरफान पठाण  हा भारताने 2007 साली जिंकलेल्या टी-20 वर्ल्ड कप संघाचा खेळाडू आहे. इरफान पठाण या समालोचन करताना दिसतो. भारताकडून कसोटीमध्ये पाकिस्तानविरूद्ध त्याने हॅट्रिक घेतली होती. अष्टपैलू खेळाडू म्हणून इरफान आणि त्याचा भाऊ युसूफ पठाण यांनी कमाल कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ:-

रोहित शर्मा(C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (VC), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर