AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, राहुल दुसऱ्या स्थानी, रनमशीन विराट फ्लॉप

विराट कोहलीला दशकातली सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कराने जाहीर करण्यात आला. मात्र यावर्षी विराटला एकही शतक लगावता आले नाही.

यंदा सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, राहुल दुसऱ्या स्थानी, रनमशीन विराट फ्लॉप
रनमशीन अशी बिरुदावली मिरवणाऱ्या विराट कोहलीला 2020 मध्ये एकही शतक लगावता आले नाही. मात्र केएल राहुलने या वर्षात दमदार कामगिरी केली.
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 30, 2020 | 11:54 AM
Share

मेलबर्न : मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर (Team India Beat Australia By 8 wickets in 2nd Test) 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2020 या सरत्या वर्षाचा शेवट गोड केला. 2020 वर्षात कोरोनामुळे अनेक क्रिकेट स्पर्धा या रद्द किंवा स्थगित कराव्या लागल्या. तसेच काही महिने सर्वच ठप्प होतं. या 2020 च्या शेवटाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने दशकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू्ंना पुरस्काराने सन्मानित केलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू या पुरस्काराने गौरवण्यात आलं. मात्र या विराटला 2020 या वर्षात टी 20, एकदिवसीय आणि कसोटीमध्ये एकही शतक लगावता आले नाही. मात्र केएल राहुल (K L Rahul)  हिट ठरला आहे. (Top 5 highest scoring batsman in 2020)

सरत्या वर्षाच्या निमित्ताने आपण या तिन्ही फॉर्मेटमधील टॉप 5 फलंदाजांची आकडेवारी पाहणार आहोत.

वनडेमधील टॉप 5 बॅट्समन

विशेष म्हणजे या टॉप 5 फलंदाजांमध्ये 4 ऑस्ट्रेलियन फंलदाजांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे एरॉन फिंच, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशाने, डेव्हिड वॉर्नरचा समावेश आहे. तर या टॉप 5 मध्ये केएल राहुल हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.

ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंच हा या वर्षातील वनडे क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. फिंचने 2020 मध्ये एकूण 13 वनडे सामन्यात 56.08 च्या सरासरीने 2 शतक आणि 5 अर्धशतकांसह एकूण 673 धावा केल्या.

2020 मधील टॉप 5 वनडे फलंदाज

एरॉन फिंच- 13 सामने, 2 शतक-5 अर्धशतक, धावा-673

स्टीव्ह स्मिथ- 10 सामने, 3 शतक-2 अर्धशतक, धावा-568

मार्नस लाबुशाने- 13 सामने, 1 शतक-3 अर्धशतक, धावा-473

डेव्हिड वॉर्नर-12 सामने, 1 शतक-3 अर्धशतक, धावा-465

केएल राहुल-9 सामने, 1 शतक-3 अर्धशतक, धावा-443

टी 20 मधील 5 स्टार फंलदाज

टी 20 क्रिकेटमध्ये या वर्षी टॉप 5 फलंदाजांमध्येही केएलचा समावेश आहे. या यादीत राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा मोहम्मद हाफीज आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा डी मलन आहे. तर न्यूझीलंडच्या टीम सायफर्ट चौथ्या स्थानावर आहे. तर कतारचा कामरान खान पाचव्या क्रमांकावर आहे.

मोहम्मद हाफीज-10 मॅच, 415 धावा, 4 अर्धशतक

केएल राहुल- 11 मॅच, 404 धावा, 4 अर्धशतक

डी मलन – 10 मॅच, 397 धावा, 4 अर्धशतक

टीम सायफर्ट – 11 मॅच, 352 धावा, 4 अर्धशतक

कामरान खान-7 मॅच, 335 धावा, 3 अर्धशतक

कसोटीतील फनटॅस्टिक फाईव्ह फलंदाज

कसोटी क्रिकेटमध्ये वर्षभरात कोणत्याच भारतीय फलंदाजाला आपली छाप सोडता आली नाही. या वर्षात टेस्टमध्ये सर्वोत्तम कामिगरी करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांमध्ये एकही भारतीय नाही.

टेस्टमध्ये यावर्षी इंग्लंडच्या फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली आहे. टॉप 5 मध्ये 4 फलंदाज हे इंग्लंडचे आहेत. बेन स्टोक्स, डॉम सिबले, जॅक क्राऊली आणि जोस बटलरचा समावेश आहे. तर न्यूझीलंडचा केन विल्यमन्सचाही यात समावेश आहे.

बेन स्टोक्स- 7 मॅच, 641 धावा, 2 शतक-2 अर्धशतक

डॉम सिबले – 9 मॅच, 615 धावा, 2 शतक-2 अर्धशतक

जॅक क्राऊली – 7 मॅच, 580 धावा, 1 शतक-3 अर्धशतक

केन विल्यमन्सन – 4 मॅच, 498 धावा, 2 शतक-1 अर्धशतक

जोस बटलर- 9 मॅच, 497 धावा, 1 शतक-2 अर्धशतक

रनमशीन विराट अयशस्वी

विराटला आयसीसीने दशकातील सर्वश्रेष्ठ पुरस्काराने गौरवण्यात आलं. मात्र विराटला या वर्षात एकाही फॉर्मेटमध्ये टॉप 5 मध्ये स्थान मिळवता आले नाही. विराट वनडेमध्ये सहाव्या, टी 20 मध्ये सातव्या क्रमांकावर आहे. मात्र दुसऱ्या ठिकाणी टीम इंडियाच्या केएल राहुलचा एकदिवसीय आणि टी 20 मध्ये टॉप 5 मध्ये समावेश आहे. केएलसाठी 2020 हे वर्ष धावांच्या बाबतीत फार चांगलं राहिलं आहे.

संबधित बातम्या :

ICC Awards | विराट कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर

(Top 5 highest scoring batsman in 2020)

Follow Us
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....