IND vs PAK : अहम में ये वहम पाल रखा है! गौतम गंभीर याने इशान किशनची स्तुती करताना असा साधला निशाणा

Gautam Gambhir Commentary IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु आहे. या सामन्यात समालोचन करताना गौतम गंभीर याने मोठं वक्तव्य केलं. इशान किशनची स्तुती करताना निशाणा साधला.

IND vs PAK :  अहम में ये वहम पाल रखा है! गौतम गंभीर याने इशान किशनची स्तुती करताना असा साधला निशाणा
IND vs PAK : समालोचन करताना गौतम गंभीर याने संधी साधली आणि इशानचं कौतुक करताना बोलून गेला असं काही...
| Updated on: Sep 02, 2023 | 8:43 PM

मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यात गौतम गंभीर समालोचन करत आहे. गौतम गंभीर फिल्डवर असो की समालोचन करत असो, आक्रमक स्वभाव काही सोडत नाही. यावेळी त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंची स्तुती करताना महेंद्रसिंह धोनी याच्यावर निशाणा साधला. समालोचन करताना त्याने विकेटकीपर इशान किशन याच्या फलंदाजीची स्तुती केली. मात्र ही स्तुती करत असताना निशाण्यावर दुसरंच कोणतरी होतं. गौतम गंभीर याने अनेकदा महेंद्रसिंह धोनीवर निशाणा साधला आहे. यावेळीही त्याने संधी सोडली नाही. शायरीमध्ये बरंच काही बोलून गेला. “अहम में ये वहम पाल रखा है, सारा कारवां मैंने संभाल रखा है. कोणत्याही विजयात संपूर्ण टीमचं योगदान असतं.”, असं त्याने सांगितलं. त्याचं वक्तव्य महेंद्रसिंह धोनी याच्या दिशेन असल्याचं बोललं जात आहे.

मी नाही हरभजन सिंग याने सामना जिंकवला…

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु असताना 2010 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याचा उल्लेख झाला. भारत पाक सामन्यादरम्यान त्या वादाबाबत काही दृष्य दाखवण्यात आली. तेव्हा नक्की काय झालं होतं? कामरान अकमल तुला काय बोलला होता? असा प्रश्न टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने गौतम गंभीर याला कॉमेंट्री दरम्यान केला. यावर गंभीरने सर्वकाही सांगितलं.

“मी हा सामना जिंकवला नाही तर हरभजन सिंह याने जिंकवला. जो शेवटी धावा करतो तोच सामना जिंकवतो. भागीदारी माझी आणि धोनी यांच्यात झाली होती. पण हरभजन सिंह याचं योगदान कठीण परिस्थितीत चांगलं होतं.” असं गौतम गंभीर याने सांगितलं. या माध्यमातून त्याने महेंद्रसिंह धोनी याच्यावर निशाणा साधला.

हरभजन सिंग याने या सामन्यात 11 चेंडूत 2 षटकाराच्या मदतीने 15 धावा केल्या. 50 षटकाच्या शेवटच्या चेंडूवर महेंद्रसिंह धोनीने मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला आणि भारताने 3 गडी राखून विजय मिळवला. गंभीरने 83 आणि धोनीने 56 धावा केल्या होत्या. दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली होती.

तेव्हा काय म्हणाला होता गौतम गंभीर

वनडे वर्ल्डकप 2011 च्या शेवटच्या षटकारावरून गौतम गंभीर याने महेंद्रसिंह धोनी याच्यावर अनेकदा निशाणा साधला आहे. त्याने सांगतिलं होतं की “युवराज सिंग याचा विजयात मोठा वाटा होता. युवराज सिंग याने दोन्ही वर्ल्डकप जिंकवले. 2 विकेट घेणाऱ्या जाहीर खान याचंही योगदान आहे. “