CSK IPL 2022: धोनीच बेस्ट फिनिशर का? शेवटच्या पाच षटकातील ‘या’ आकेडवारीवर नजर मारा म्हणजे समजेल

| Updated on: Mar 18, 2022 | 8:44 PM

CSK IPL 2022: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेला 26 मार्च रोजी सुरुवात होत आहे. दोन नव्या फ्रेंचायजींमुळे एकूण 10 टीम्स झाल्या आहेत. एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत.

CSK IPL 2022: धोनीच बेस्ट फिनिशर का? शेवटच्या पाच षटकातील या आकेडवारीवर नजर मारा म्हणजे समजेल
IPL 2022 - एमएस धोनी
Image Credit source: File photo
Follow us on

नवी दिल्ली – बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेला 26 मार्च रोजी सुरुवात होत आहे. दोन नव्या फ्रेंचायजींमुळे एकूण 10 टीम्स झाल्या आहेत. एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. यंदा महेंद्रसिंह धोनी (MS dhoni) आपल्या चेन्नई सुपर किंग्सला पाचव्यांदा किताब जिंकवून देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. डिफेंडिंग चॅम्पियन चेन्नई (CSK) यंदाही विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. धोनी असताना हे शक्य आहे. कारण आकडेच याबद्दल सर्वकाही सांगून जातात. आयपीएलच्या इतिहासात अजूनपर्यंत धोनीपेक्षा उत्तम फिनिशर दुसरा कोणीही झालेला नाही. शेवटच्या पाच षटकात धावा बनवण्याची गरज असेल आणि धोनी क्रीझवर असेल, तर गोलंदाजांची धुलाई ठरलेली आहे. रेकॉडर्सवर नजर मारली, तर शेवटच्या पाच षटकात सर्वाधिक धावा बनवण्यामध्ये धोनी नंबर 1 आहे.

धोनीने 15 व्या षटकात आतापर्यंत सर्वाधिक 442 धावा केल्या आहेत. 16 व्या षटकात धावांची गती अधिक वेगवान होते. या षटकात धोनीने सर्वाधिक 476 धावा केल्या आहेत. शेवटच्या पाच षटकात कुठल्या फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्यात, जाणून घेऊया.

16 व्या षटकात सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज
महेंद्र सिंह धोनी – 476 रन
एबी डिविलियर्स – 447 रन
रोहित शर्मा       – 336 रन
कायरन पोलार्ड  – 314 रन
युवराज सिंह    – 305 रन

17 व्या षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
महेंद्र सिंह धोनी – 572 रन
कायरन पोलार्ड  – 445 रन
एबी डिविलियर्स – 386 रन
रोहित शर्मा       – 362 रन
दिनेश कार्तिक  – 360 रन

18 व्या षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
महेंद्र सिंह धोनी – 596 रन
कायरन पोलार्ड  – 433 रन
एबी डिविलियर्स – 406 रन
रोहित शर्मा       – 293 रन
विराट कोहली   – 276 रन

19 व्या षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
महेंद्र सिंह धोनी – 599 रन
एबी डिविलियर्स – 404 रन
कायरन पोलार्ड  – 362 रन
रवींद्र जडेजा    – 305 रन
हार्दिक पंड्या   – 273 रन

20 व्या षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
महेंद्र सिंह धोनी – 610 रन
कायरन पोलार्ड  – 378 रन
रवींद्र जडेजा    – 276 रन
रोहित शर्मा     – 248 रन
हार्दिक पंड्या   – 233 रन