IPL 2022: धोनी 7 नंबरची जर्सी का वापरतो? त्यानेच सांगितलं यामागचं रहस्य, पहा VIDEO

IPL 2022: प्रत्येक यशस्वी क्रीडापटूची (Sports person) एक वेगळी ओळख असते. मैदानावरील कामगिरी, रेकॉर्ड बरोबरच त्या क्रीडापटूच्या जर्सी नंबरबद्दल चाहत्यांना बरंच आकर्षण असतं.

IPL 2022: धोनी 7 नंबरची जर्सी का वापरतो? त्यानेच सांगितलं यामागचं रहस्य, पहा VIDEO
IPL 2022 - एमएस धोनी Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 9:51 PM

मुंबई: प्रत्येक यशस्वी क्रीडापटूची (Sports person) एक वेगळी ओळख असते. मैदानावरील कामगिरी, रेकॉर्ड बरोबरच त्या क्रीडापटूच्या जर्सी नंबरबद्दल चाहत्यांना बरंच आकर्षण असतं. हा जर्सी नंबर क्रीडापटूची एक ओळख बनून जातो. फुटबॉलमध्ये (Foot ball) लायोनेल मेसीचा जर्सी नंबर 10, ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा जर्सी नंबर 7, विराट कोहलीचा (Virat kohli) नंबर 18, रोहित शर्माचा नंबर 45 ही यादी अशीच वाढत जाईल. कुठल्याही क्रीडा प्रकारात खेळाडू आणि त्याचा जर्सी नंबर विशेष असतो. या जर्सी नंबरमागे काय कहाणी दडलेली आहे, याची चाहत्यांना प्रचंड उत्सुक्ता असते. अमुक एक खेळाडूचा हाच जर्सी नंबर का? त्यामागे काय धारणा आहे, हा नंबर लकी आहे का? असे बरेच प्रश्न चाहत्यांना पडत असतात.

धोनीने सांगितलं 7 नंबरची जर्सी वापरण्यामागचं कारण

भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू एमएस धोनीच्या जर्सी नंबर 7 बद्दल अनेकांना कुतूहल आहे. धोनीने आज जर्सी नंबर 7 वापरण्यामागचं रहस्य उघड केलं. धोनी अनेकवर्षापासून 7 नंबरची जर्सी घालून मैदानावर उतरतोय. धोनीने सात नंबर वापरण्यामागे आतापर्यंत वेगवेगळया कथा जोडण्यात आल्या. अखेर आता धोनीने स्वत: त्याबद्दल खुलासा केला. सात नंबरची जर्सी वापरण्यामागे कुठलं वेगळं कारण नाहीय, ती धोनीची जन्मतारीख आहे. म्हणून धोनी 7 नंबरची जर्सी वापरतो.

उलगडलं सातचं कोडं

CSK ने इंडिया सिमेन्टस फॅमिलीसाठी व्हर्च्युअल चॅटचा कार्यक्रम आयोजित केला होता. धोनी त्यात सहभागी झाला होता. “अनेकांना सुरुवातीला असं वाटलं की, 7 नंबर माझ्यासाठी लकी आहे. मी सात नंबर निवडण्यामागे साध, सोप कारण आहे. 7 तारीख माझा जन्मदिवस आहे. सातवा महिना सात तारीख. कुठला नंबर चांगला वैगेर यामध्ये पडण्यापेक्षा मी माझ्या जन्मतारखेची जर्सी वापरु लागलो” धोनीने स्वत: ही माहिती दिली.

एमएस धोनी भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी तो आयपीएलमध्ये अजूनही खेळतो. चाहते यंदा सुद्धा धोनीचा खेळ पाहण्यासाठी उत्सुक आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत चार वेळा आयपीएल स्पर्धेच जेतेपद पटकावलं आहे.

Non Stop LIVE Update
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.