चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2026 स्पर्धेत चॅम्पियन होणार? तामिळनाडूत सत्ता बदल झाल्याने असा योगायोग

आयपीएल 2026 स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. आरसीबीने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. पण इतर तीन स्थानांसाठी चुरस आहे. असं असताना जेतेपद चेन्नई सुपर किंग्स मिळवणार अशी चर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे. चला जाणून घेऊयात काय योगायोग आहे तो...

चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2026 स्पर्धेत चॅम्पियन होणार? तामिळनाडूत सत्ता बदल झाल्याने असा योगायोग
चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2026 स्पर्धेत चॅम्पियन होणार? तामिळनाडूत सत्ता बदल झाल्याने असा योगायोग
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 18, 2026 | 4:22 PM

आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या चार संघांची नावं लवकरच समोर येतील. यापैकी आरसीबीने प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. आता उर्वरित तीन जागांसाठी 7 संघांमध्ये चुरस आहे. यात गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आहेत. त्यामुळे या सात पैकी कोणते तीन संघ प्लेऑफमध्ये एन्ट्री घेतील. त्यामुळे सात संघात तीन जागांसाठी चुरस असून चेन्नई सुपर किंग्सही या शर्यतीत आहे. असं असताना प्लेऑफमध्ये जागा पक्की नसताना जेतेपदासाठी एक योग जुळवून आला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांमध्ये आनंद संचारला आहे. तामिळनाडूत सत्ता बदल झाल्याने जेतेपदासोबत समीकरण जुळवलं जात आहे. कारण आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यानंतर जेव्हा तामिळनाडूत सरकार बदललं तेव्हा सीएसकेने जेतेपद पटकावलं आहे. यंदाही चेन्नईत सत्तांतर झालं असून जेतेपदाच्या आशा जागा झाल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्स जेतेपद मिळवू शकते?

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलचं जेतेपद पाचवेळा पटकावलं आहे. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स 18 पर्वात 12 प्लेऑफ खेळली आहेत. तामिळनाडूत सत्ता बदल झाल्याने 13व्यांदा प्लेऑफ आणि सहाव्यांदा जेतेपद पटकावेल असं बोललं जात आहे. तामिळनाडू 2011 मध्ये सत्तांतर झाले तेव्हा चेन्नई सुपर किंग्सने दुसऱ्यांदा जेतेपद पटकावलं होतं. 2011 मध्ये जयललिता यांच्या नेतृत्त्वात एआयडीएमकेचं सरकार सत्ते आलं होतं. तेव्हा 234 पैकी 150 जागा जिंकल्या होत्या. सरकार बदललं आणि चेन्नई सुपर किंग्सने जेतेपदही पटकावलं होतं.

तामिळनाडून 2021 मध्ये पुन्हा सत्तांतर झालं. डीएमकेने एआयडीएमकेला पराभूत करत सत्ता मिळवली. एमके स्टालिन यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर आयपीएल 2021 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जेतेपद पटकावलं. आता 2026 मध्ये पुन्हा सत्तांतर झालं आहे. अभिनेता ते राजकीय नेता असा प्रवास करणाऱ्या टीव्हीकेच्या जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. त्यात चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफच्या शर्यतीत आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी उर्वरित दोन सामन्यात जिंकणं भाग आहे. तसं झालं तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. अंतिम फेरी गाठली आणि जेतेपद जिंकलं तर हा योग तिसऱ्यांदा जुळून येईल. आता हा योग जुळून येतो की नाही पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Follow Us