WPL 2024, UPW vs MI : मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकत घेतली फलंदाजी, अशी असेल प्लेइंग 11

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा 14 वा सामना युपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. या सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. टॉप 3 मध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय फायदेशीर ठरणार आहे. युपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत.

WPL 2024, UPW vs MI : मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकत घेतली फलंदाजी, अशी असेल प्लेइंग 11
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 7:09 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामन्याती निकाल गुणतालिकेवर प्रभाव टाकत आहे. मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात सामना होत आहे. दोन्ही संघ स्पर्धेत दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहे. पहिल्या सामन्यात युपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सला पराभवाचं पाणी पाजलं होतं. किरण नवगिरेच्या आक्रमक खेळीपुढे मुंबईचं काही एक चाललं नाही. हा सामना युपी वॉरियर्सने 7 गडी आणि 21 चेंडू राखून जिंकला होता. आता या सामन्यात कोण बाजी मारते याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सच्या बाजूने लागला. बंगळुरुनंतर आता दिल्लीत पहिल्यांदा फलंदाजी करणं जास्त प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे. त्यानुसार मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली, “आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. शेवटच्या दोन सामन्यांमध्ये दव नाही, हेच एकमेव कारण आहे. दव असताना पाठलाग करणे हा उत्तम पर्याय आहे, अन्यथा स्वतःवर दबाव का ठेवायचा. आम्ही त्याच टीमसोबत जात आहोत.” तर एलिसा हिली म्हणाली की, “दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. त्यामुळे नाणेफेकीने काही फरक पडत नाही. शेवटचे दोन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत परंतु प्रथम गोलंदाजी करण्यास आमची हरकत नाही. हा एका वेळी एकच खेळ आहे आणि त्यावर लक्ष केंद्रित करा, उद्याच्या खेळाचा नंतर विचार करा.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, एस सजना, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, उमा चेत्री, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.