मोठी बातमी! WPL 2027 च्या हंगामासाठी संघाकडून रिटेंशन लिस्ट जाहीर! RCBनं विस्फोटक फलंदाजाला सोडलं; टीम्सनी कोणाला ठेवलं, कोणाला सोडलं? पाहा…

WPL 2027 Retention List: बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, सर्व फ्रँचायझींनी २८ सप्टेंबरपर्यंत संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची घोषणा करावी. ही प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे.

मोठी बातमी! WPL 2027 च्या हंगामासाठी संघाकडून रिटेंशन लिस्ट जाहीर! RCBनं विस्फोटक फलंदाजाला सोडलं; टीम्सनी कोणाला ठेवलं, कोणाला सोडलं? पाहा...
| Updated on: Sep 28, 2026 | 8:45 PM

२०२७ च्या हंगामासाठी होणाऱ्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावापूर्वी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या लिलावाच्या महिनाभरापूर्वीच सर्व फ्रँचायझींनी कायम ठेवलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. मात्र यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

महिला प्रीमियर लीग २०२७ च्या लिलावापूर्वी पाचही संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघ सर्वाधिक चर्चेत होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू एलिस पेरीला संघातून मुक्त करेल अशी अपेक्षा होती. पण आता हे निश्चित झाले आहे की, पेरी डब्ल्यूपीएल २०२७ मध्येही आरसीबीकडूनच खेळणार आहे. एका स्फोटक खेळाडूला मुक्त करून आरसीबीने चाहत्यांना धक्का दिला आहे.

Loading...

महिला प्रीमियर लीग २०२७ ही या लीगची पाचवा हंगाम आहे. यात पाच संघ (दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स) सहभागी होत आहेत. ही स्पर्धा १४ जानेवारी रोजी सुरू होणार आहे. अंतिम सामना ७ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी कोची येथे लिलाव आयोजित करण्यात आला आहे. संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंना या लिलावासाठी नोंदणी करता येणार आहे.

संघांनी खेळाडू कायम ठेवल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सकडे सर्वाधिक जागा शिल्लक आहेत. त्यांच्याकडे प्रत्येकी ७ जागा आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सकडे प्रत्येकी ५ जागा आहेत. गुजरात जायंट्सकडे सर्वात कमी जागा (३) आहेत. आरसीबी आणि यूपीकडे परदेशी खेळाडूंसाठी प्रत्येकी २ जागा शिल्लक आहेत. तर इतर तीन संघांकडे परदेशी खेळाडूंसाठी प्रत्येकी १ जागा आहे.

कोणत्या संघाने कोणाला कायम ठेवले अन् कुणाला मुक्त केले?

दिल्ली कॅपिटल्स
रिलीज: अलाना किंग, लिझेल ली, स्नेह राणा, तानिया भाटिया, प्रगती सिंग, एडला सृजना

कायम ठेवलेले: ॲनाबेल सदरलँड, शीनेल हेन्री, लॉरा वोल्वार्ड, लुसी हॅमिल्टन, मारिझान कॅप, दिया यादव, जेमिमाह रॉड्रिग्स, ममता माडीवाला, मिन्नू मणी, एन श्री चरणी, नंदनी शर्मा, निकी प्रसाद, शेफाली वर्मा

जागा: ५ (एक परदेशी नागरिक)

गुजरात जायंट्स
रिलीज: डॅनियल व्याट-हॉज, आयुषी सोनी, तीतास साधू, शिवानी सिंग

राखून ठेवलेले: ॲशलेह गार्डनर, बेथ मूनी, जॉर्जिया वेअरहम, किम गर्थ, सोफी डिव्हाईन, अनुष्का शर्मा, भारती फुलमाली, हॅपी कुमारी, जिंतीमणी कलिता, कनिका आहुजा, काश्वी गौतम, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, तनुजा कंवर, यस्तिका भाटिया

जागा: ३ (एक परदेशी नागरिक)

मुंबई इंडियन्स
रिलीज: मिली इलिंगवर्थ, जी. कमलिनी, क्रांती रेड्डी, पूनम खेमनार, सायका इशक, त्रिवेणी वशिष्ठ

कायम: मेली कार, हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, निकोला केरी, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर, राहिला फिरदौस, एस सज्जना, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, वैष्णवी शर्मा

जागा: ७ (एक परदेशी नागरिक)

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
रिलीज: ग्रेस हॅरिस, लिनसे स्मिथ, डी हेमलता, गौतमी नायक

कायम: स्मृती मानधना, एलिस पेरी, जॉर्जिया वॉल, लॉरेन बेल, नदिन डी क्लार्क, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, प्रत्युषा कुमार, प्रेमा रावत, राधा यादव, रिचा घोष, सायली सातघरे, श्रेयंका पाटील

स्लॉट्स: ५ (२ परदेशी)

यूपी वॉरियर्स
रिलीज: एमी जोन्स, चार्ली नॉट, क्लो ट्रायॉन, डिआंड्रा डॉटिन, आशा शोबाना, जी त्रिशा, किरण नवगिरे, श्वेता सहरावत, सुमन मीना

कायम: मेग लॅनिंग, फोबी लिचफिल्ड, सोफी एक्लेस्टन, तारा नॉरिस, दीप्ती शर्मा, हरलीन देओल, क्रांती गौड, प्रतिका रावल, शिखा पांडे, शिप्रा गिरी, सिमरन शेख

स्लॉट्स: ११ (२ परदेशी)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us