MS Dhoni Yuvraj Singh Reunion : अनेक वर्षांनंतर धोनी-युवराजची भेट, फोटो व्हायरल

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भलेही क्रिकेटच्या मैदानापासून दूर असेल, पण सोशल मीडियावर तो नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतो. कधी त्याच्या लूकचे फोटो व्हायरल होतात तर कधी त्याचे पाळीव प्राण्यांसोबत खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

1/5

2/5
धोनीचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग माहीसोबत दिसत आहे. दोघेही सोफ्यावर बसून एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यादरम्यान दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. हा व्हिडिओ युवराजने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.

3/5
या दोन्ही दिग्गजांना बऱ्याच दिवसांनी एकत्र पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर हे फोटो व्हायरल होत आहेत. मात्र, या विशेष बैठकीचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

4/5
युवराज आणि धोनी करिअरच्या सुरुवातीला चांगले मित्र होते. मात्र, मधल्या काळात अनेक वेळा या दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. युवराजचे वडील योगराज सिंग धोनीवर सतत आरोप करत असतात, पण युवराजने त्यांचे आरोप कधीच मान्य केले नाहीत.

5/5
युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांवरही प्रेम करणाऱ्या चाहत्यांची कमी नाही. या जोडीने एकत्र येत चाहत्यांना आनंद साजरा करण्याच्या अनेक संधी दिल्या. या जोडीमुळे भारतीय संघाने अनेक सामने जिंकले आहेत. या जोडीने भारताला 2007 चा टी-20 विश्वचषक आणि नंतर 2011 चा विश्वचषक जिंकून दिला.

Published On - 2:32 pm, Tue, 7 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI