U-19 Asia Cup Final : फायनलमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडियावर ICC ने कारवाई करावी, दिलीप वेंगसरकर यांच्या मागणीने सगळेच अवाक, पण कारण काय?

U-19 Asia Cup Final : लास्ट बॉलवर पाकिस्तानवर मात करुन भारताच्या युवा खेळाडूंनी अंडर 19 आशिया कप जिंकला. या विजेत्या संघातील काही गोष्टी माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांना खटकल्या. त्यामुळे त्यांनी ICC ने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

U-19 Asia Cup Final : फायनलमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडियावर ICC ने कारवाई करावी, दिलीप वेंगसरकर यांच्या मागणीने सगळेच अवाक, पण कारण काय?
dilip vengsarkar
| Updated on: Nov 17, 2026 | 10:37 AM

पाकिस्तान विरुद्ध अंडर 19 आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जे सेलिब्रेशन केलं, त्यावरुन क्रिकेट विश्वात वादविवाद सुरु आहेत. विजयानंतर काही भारतीय खेळाडूंचं मैदानावर जे वागणं होतं, ते माजी भारतीय कर्णधार आणि चीफ सिलेक्टर दिलीप वेंगसकरकर यांना पटलेलं नाही. त्यांनी खेळाडूंच्या अशा वागण्यावर टीका केली आहे. “अशा प्रकारचं वागणं हे खेळ भावनेच्या विरोधात आहे, युवा क्रिकेटपटूंवर याचा चुकीचा परिणाम होईल” असं दिलीप वेंगसरकर यांना वाटतं. शनिवारी आशिया कप अंडर 19 ची फायनल पार पडली. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 338 धावांचं अवघड लक्ष्य ठेवलं होतं. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची गरज असताना भारताच्या मोहित उलवाने चौकार मारुन थरारक विजय मिळवून दिला.

विजयाचा क्षण इतका इमोशनल होता की, भारतीय खेळाडूंनी पॅवेलियनमधून मैदानावर धाव घेतली. त्यांच्या चेहऱ्यांवरुन विजयाचा आनंद ओसांडून वाहत होता. त्यावेळी टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी पाकिस्तानी टीमकडे पाहून काही इशारे, हातवारे केले. एक भारतीय खेळाडू पाकिस्तानी विकेटकीपरच्या खूप जवळ गेला आणि जोरात ओरडला. त्याला उद्देशून अपशब्द बोलला. काही खेळाडूंनी पाकिस्तानी ड्रेसिंग रुम आणि खेळाडूंकडे पाहून अभद्र इशारे केले. यावरुन भारतीय क्रिकेट चाहते आणि एक्सपर्ट्समध्ये चर्चा सुरु आहेत.

Loading...

खेळासाठी हे बिलकुल चांगलं नाहीय

वेंगसरकर या विषयावर टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्राशी बोलले. ते म्हणाले की, “खेळासाठी हे बिलकुल चांगलं नाहीय. युवा खेळाडू हे सर्व टीव्हीवर पाहतात आणि अंडर-14, अंडर-16 किंवा अंडर-19 मध्ये खेळताना अशीच नक्कल करतात” “हे असचं सुरु राहिलं तर आपण कुठे जाणार आहोत?. खेळाडूंना मैदानाच्या आत आणि बाहेर कसं वागायचं हे शिकवलं पाहिजे. त्यासाठी नॅशनल क्रिकेट अकादमी आणि दुसऱ्या माध्यमांचा वापर करता येऊ शकतो” असं दिलीप वेंगसरकर म्हणाले.

तुम्ही चुकीचं उदहारण ठेवता

भारत-पाकिस्तान सामना भावनांनी ओतप्रोत भरलेला असतो हे दिलीप वेंगसरकरांनी मान्य केलं. पण म्हणून अशा चुकीच्या वागण्याला योग्य ठरवता येऊ शकत नाही. “मी समजू शकतो भारत-पाकिस्तान सामने भावनात्मक असतात. जोश, त्वेष एकदम हाय असतो. पण म्हणून याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागा. अशा घटनांमधून तुम्ही युवा खेळाडूंसमोर चुकीचं उदहारण ठेवता” असं दिलीप वेंगसरकर स्पष्टपणे म्हणाले.

वेंगसरकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, आशियाई क्रिकेट काऊन्सिल आणि मॅच रेफरींकडे अशा वागण्यासाठी खेळाडूंना संदेश द्यावा अशी मागणी केली आहे. खेळाची शिस्त टिकवून ठेवण्यासाठी मजबूत आचार संहिता आवश्यक आहे असं वेंगसरकर यांचं मत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us