AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शोएब अख्तरचा पाकिस्तानी खेळाडूंना सल्ला, विराटकडून शिका

"भारतीय टीमचे अनुकरण करा. भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून शिकून घ्या", असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने (Shoaib Akhtar suggestion to pakistan cricket team) पाकिस्तानी खेळाडूंना दिला.

शोएब अख्तरचा पाकिस्तानी खेळाडूंना सल्ला, विराटकडून शिका
| Edited By: | Updated on: Dec 24, 2019 | 9:22 AM
Share

इस्लामाबाद : “भारतीय टीमचे अनुकरण करा. भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून शिकून घ्या”, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने (Shoaib Akhtar suggestion to pakistan cricket team) पाकिस्तानी खेळाडूंना दिला. अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हा सल्ला दिला आहे. सध्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्यासोबतच व्हिडीओच्या कॉमेंटमध्येही विराटचे कौतुक युजर्सकडून केले जात आहे.

“पाकिस्तान आपल्या आक्रमक क्रिकेट खेळीमुळे ओळखला जात होता. आम्ही कधी घाबरत नव्हतो. आम्ही आक्रमकपणे खेळायचो आणि लढायचो”, असं अख्तरने (Shoaib Akhtar suggestion to pakistan cricket team) व्हिडीओमध्ये खेळाडूंना सल्ला देताना सांगितले.

“आपल्या कर्णधाराची तुलना भारतीय कर्णधारासोबत करा. अजहर अली (कर्णधार) आणि मिस्बाह उल हक (प्रशिक्षक) यांना असा मार्ग शोधावा लागेल जो पाकिस्तानी टीममध्ये प्रगती घडवेल. अशी रणनीती असावी की कशाप्रकारे आपण विराट कोहलीच्या टीमपेक्षा उत्कृष्ट बनू”, असं अख्तरने सांगितले.

यावेळी त्याने विराटच्या फिटनेसचे कौतुकही केले. तसेच पाकिस्तानचा माजी कर्णधार इमरान खान यांनी टीम सुधारण्यासाठी किती मेहनत घेतली होती याबद्दलही त्याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

अख्तर म्हणाला, “कोहली फिटनेसप्रेमी आहे. जर असा कर्णधार असेल तर टीमही त्याला पूर्णपणे फॉलो करते. मला वाटते अशी गोष्ट आपल्या टीममध्येही जेव्हा इमरान खान कर्णधार होते तेव्हा होती. ते मैदानावर यायचे आणि कुणाचेही न ऐकता मैदानात 10 फेऱ्या मारायचे. त्यानंतर तीन तास नेटमध्ये गोलंदाजी करत होते”.

“रणनीतीमध्ये ते मजबूत कर्णधार नसले तरी सामना कसा जिंकता येईल याची माहिती त्यांना होती. आता भारतही तेच करत आहे. कोहलीची नजर पाहा तो आक्रमकपणे खेळत असतो. खेळाडू कर्णधाराला फॉलो करतात”, असंही अख्तरने सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.