हार्दिक आणि नताशाच्या साखरपुड्यावर हार्दिकचे वडील म्हणतात...

भारतीय क्रिकेट संघाचा सुपर कूल खेळाडू हार्दिक पंड्या याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गर्लफ्रेंड नताशा स्टानकोविकसोबत साखरपुडा (Himanshu pandya reaction on engagement) केला.

हार्दिक आणि नताशाच्या साखरपुड्यावर हार्दिकचे वडील म्हणतात...

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा सुपर कूल खेळाडू हार्दिक पंड्या याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गर्लफ्रेंड नताशा स्टानकोविकसोबत साखरपुडा (Himanshu pandya reaction on hardik engagement) केला. हा साखरपुडा दुबईत पार पडला. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. या साखरपुड्याच्या बातमीनंतर हार्दिकच्या चाहत्यांना तसेच त्याचे वडील हिमांशू पंड्या यांना आश्चर्याचा धक्का बसला. हार्दिक पंड्याच्या साखरपुड्यानंतर भारतीय टीमनेही त्याला शुभेच्छा (Himanshu pandya reaction on hardik engagement) दिल्या.

“आम्हाला माहित होते की, हार्दिक आणि नताशा दुबईत सुट्टी एन्जॉय करत आहेत. नताशा एक चांगली मुलगी आहे. मी बऱ्याचदा तिला मुंबईत भेटलो आहे. पण अचानक त्यांच्या साखरपुड्याची बातमी ऐकून धक्का बसला”, असं हार्दिकचे वडील हिंमाशू यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.

“त्या दोघांनी साखरपुडा केला ही तर आनंदाची गोष्ट आहे. पण अजून आम्ही लग्नाची तारीख ठरवलेली नाही. लवकरच लग्न कधी घ्यायचे ही तारीख ठरवली जाईल”, असंही हिमांशू यांनी सांगितले.

दरम्यान, नताशा एक सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नताशाने अनेक म्यूझिक अल्बम आणि टीव्ही शोमध्येही तिने काम केलं आहे. याशिवाय प्रसिद्ध बिग बॉस कार्यक्रमातही ती दिसली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *