AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रँकिंगमध्ये कोहली अव्वल, आसपास कोणीही नाही!

दुबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. तर गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडाही पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. आयसीसीच्या ताज्या रँकिंगनुसार कोहलीने 935 गुणांसह पहिलं स्थान कायम राखलं. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यांमध्ये या गुणांत भर […]

रँकिंगमध्ये कोहली अव्वल, आसपास कोणीही नाही!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

दुबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. तर गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडाही पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.

आयसीसीच्या ताज्या रँकिंगनुसार कोहलीने 935 गुणांसह पहिलं स्थान कायम राखलं. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यांमध्ये या गुणांत भर घालण्याची संधी कोहलीकडे आहे. सध्या कोहलीच्या आसपासही कोणी नाही. कारण कसोटी फलंदाजांमध्ये दुसऱ्या नंबरवर ऑस्ट्रेलियाचा निलंबित कर्णधार स्टीव्ह स्मिथ (910 गुण)  आहे. पण स्मिथवर बंदी असल्याने, त्याचे गुण आणखी कमी होणार आहेत. त्यामुळे कोहलीच्या पहिल्या स्थानाला धोकाच नाही.

दरम्यान, फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या नंबरवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (876), चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट (807) आणि पाचव्या नंबरवर डेव्हिड वॉर्नर (803) आहे.

गोलंदाजांच्या रेटिंगमध्ये उलटफेर झाला आहे. केगिसो रबाडा पुन्हा अव्वलस्थानी पोहोचला आहे. रबाडेन इंग्लंडच्या जेम्स अँडरसनचं पहिलं स्थान हिसकावलं. अँडरसन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात न खेळल्यामुळे त्याचे 9 गुण कमी झाले. रबाडाच्या खात्यात 882 तर जेम्स अँडरसनच्या खात्यात 874 गुण आहेत. या यादीत तिसऱ्या नंबरवर पाकिस्तानचा मोहम्मद अब्बास (829), चौथ्या क्रमांकावर आफ्रिकेचा फिलँडर (826) आणि भारताचा रवींद्र जाडेजा 812 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

भारतीय संघ अव्वल

कसोटी रँकिंगमध्ये टीम इंडिया 116 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर 108 गुणांसह इंग्लंड दुसऱ्या, 106 गुणांसह दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, 102 गुणांसह न्यूझीलंड चौथ्या आणि ऑस्ट्रेलियाही 102 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

वन डे रँकिंगमध्ये विराट-रोहितची सलामी

दरम्यान, वन डे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारताचा विराट कोहली आणि रोहित शर्मा हे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कोहली 899 तर रोहित शर्माच्या खात्यात 871 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा रॉस टेलर (808), चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा ज्यो रुट (807) आणि पाचव्या क्रमांकावर 802 गुणांसह पाकिस्तानचा बाबर आझम आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...