PAK vs ENG T20 World Cup 2026 : त्याच्यामुळेच हरलो… इंग्लंडकडून मार खाल्ल्यावर पाकच्या कर्णधाराने कोणावर फोडलं पराभवाचं खापर ?

PAK vs ENG T20 World Cup Match : आयसीसी T20 World Cup 2026 च्या सुपर-8 मध्ये पाकिस्तानला इंग्ल्डंकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांचा सेमीफायनला मार्ग आता ऑलमोस्ट बंद झाला आहे. इंग्लंडने पाकला नमवत सहज विजय मिळवला.

PAK vs ENG T20 World Cup 2026 : त्याच्यामुळेच हरलो... इंग्लंडकडून मार खाल्ल्यावर पाकच्या कर्णधाराने कोणावर फोडलं पराभवाचं खापर ?
पाकचा पराभव, सेमीफायनलची वाट कठीण
Image Credit source: social media
| Updated on: Feb 25, 2026 | 8:37 AM

आयसीसीटी टी20 वर्ल्ड कप सुपर 8मधील गट 2 मध्ये झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा सेमीफायनला मार्ग बंद दिसतोलय, त्यांना इंग्लंडने सहज लोळवलं. उपांत्य फेरीतील आशा कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला हा विजय मिळवणं अतिशय महत्वाचं होतं, पण त्यांच्या आशांवर इंग्लंडने पाणी फेरलं. 2 गडी राखून इंग्लंडच्या संघाने पाकवर विजय मिळवला. मात्र या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांना मोठा धक्का बसला असून त्यांची चांगलीच निराशा झाली आहे. दरम्यान पाकिस्ताना कर्णधार सलमान अली आगा याने इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रूकची खूप तारीफ केली कारण त्याच्याच शतकी खेली संपूर्ण खेल पालटला. पकाविरुद्ध खेळताना इंग्लंडला 165 धावांचा पाठलाग करायचा होता, त्यावेळी हॅरी ब्रूकने 51 चेंडूत 100 धावांची मॅचविनर खेळी केली आणि आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत विजयाकडे नेले.

मॅचनंतर झालेल्या प्रेझेंटेशन सेरेमनीदरम्यान सलमान अली आगा हा स्पष्ट बोलला. पाकिस्तानने उत्तम फलंदाज करत चांगली सुरुवात केली होती परंतु आमचा संघ नीट शेवट करू शकला नाही. त्याने हॅरी ब्रुकचे कौतुक केलं. “त्याला सलाम”, असं म्हणत त्यानने ब्रूकच्या मॅचविनिंग आणि पाकिस्तानच्या सर्वोत्तम प्रयत्नांना न जुमानता सामना हिसकावून घेण्याच्या खेळीची तारीफ केली. मात्र यावेळी पाक कर्णधार सलमान अली आगा याने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी केल्याबद्दल साहिबजादा फरहानचेही कौतुक केले. काही फलंदाज अपेक्षेनुसार कामगिरी करू शकले नाहीत हे मान्य केले, परंतु विश्वचषकात हे घडू शकतं असंही तो म्हणाला.

सलमानने कोणाला ठरवलं पराभवासाठी जबाबदार ?

“आम्ही फलंदाजीने चांगली सुरुवात केली पण आम्हाला हवी तशी कामगिरी केली नाही. पण कधीकधी इतर फलंदाजांनाही श्रेय द्यावे लागते. मला वाटले की हॅरीने उत्तम फलंदाजी केली. आम्ही थोडे कमी पडलो ” असं पाक कर्णधार म्हणाला. ” मग ब्रुकने आमच्याकडून सामना हिरावून घेतला. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले. मला वाटतं की तो (फरहान) संपूर्ण विश्वचषकात खूप चांगला खेळलाय. इतर फलंदाजांनी आम्हाला हवे तसे चांगले प्रदर्शन केले नाही, पण विश्वचषकात असे होऊ शकते. त्याने (आफ्रिदी) आज खूप चांगली गोलंदाजी केली. तो लवकर विकेट घेण्यासाठी ओळखला जातो आणि आजही त्याने तेच केलं”, असंही आगा म्हणाला.

पाकिस्तान कोणामुळे हरला ?

“जेव्हा जेव्हा आम्ही इंग्लंडविरुद्ध खेळतो आणि हरतो, तेव्हा नेहमीच तो (ब्रुक) असतो. त्याला सलाम, आणि आज त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती खूप आव्हानात्मक होती. तो संपूर्ण मैदानावर फटके मारू शकतो, ज्यामुळे त्याला थांबवणे कठीण होते” असं म्हणत पाक कर्णधाराने पराभवाचं कारण अगदी स्पष्ट केलं. मात्र यावेळी त्याने तारीकच्या फलदांजीचं कौतुकही केली. “त्याने त्यांच्याविरुद्ध फार आक्रमक खेळ केला नाही, तरीही त्याने दोन विकेट घेतल्या. नवाजने 19 व्या षटकात ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यावरून मला वाटलं, की काहीही होऊ शकतं. जर 1% संधी मिळाली तर माझी टीम प्रयत्न करेल, असंही तो पुढे म्हणाला.

ब्रूकचं ऐतिहासिक शतक, इंग्लंडची संघ सेमीफायनलमध्ये धडक

पाकने दिलेल्या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सुरूवातीच्या काळात त्यांची अवस्था 4 बाद 58 अशी झाली होती, मात्र नंतर कर्णधार ब्रूकने फक्त 50 चेंडूत 100 धावा चोपत ऐतिहासिक शकत फटकावल. टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात एखाद्या टीमच्या कॅप्टनचं हे पहिलं शतक आहे. पाकतर्फे शाहीन आफ्रिदीने 4 बळी (4/30) घेतल्याने इंग्लंडने शेवटच्या षटकांत विकेट गमावल्या, तरीही इंग्लंडने संयम राखला आणि जोफ्रा आर्चरने विजयी चौकार मारून संघाला 19.1 षटकांत 8 बाद 166 अशी मजल मारून दिली आणि इंग्लंडने सामना 2 गडी राखून जिंकला.