AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs AUS | ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार

डेव्हिड वॉर्नरनंतर ऑस्ट्रेलियाचा आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.

IND Vs AUS | ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, 'हा' खेळाडू दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार
| Updated on: Dec 12, 2020 | 3:35 PM
Share

सिडनी : एकदिवसीय आणि टी 20 मालिकेनंतर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Tour Australia 2020) यांच्यात कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. डेव्हिड वॉर्नर (David Warner) दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या चिंता वाढली होती. त्या चिंतेत अजून भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर विल पुकोवस्की (Will Pucovski) पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. आयसीसीने याबाबतची माहिती ट्वविटद्वारे दिली आहे. ind vs aus 2020-21 australia opener Will Pucovski ruled out 1st test match due to injurey

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सराव सामना खेळण्यात आला. या सराव सामन्यात कार्तिक त्यागीने टाकलेला बाऊंसर चेंडू पुकोवस्कीच्या हेल्मेटवर आदळला. त्यामुळे पुकोवस्कीच्या रिटायर्ट हर्ट झाला. त्यामुळे पुकोवस्कीला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे. दरम्यान पुकोवस्कीऐवजी संघात मार्कस हॅरिस याला संधी देण्यात आली आहे.

वॉर्नरही पहिल्या सामन्याला मुकणार

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. वॉर्नरला टीम इंडिया विरोधातील दुसऱ्या एकदिवसीय मॅचदरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला तात्काळ मैदानाबाहेर जावं लागलं. पहिल्या कसोटी मॅचपर्यंत तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. यामुळे वॉर्नर दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

परिणाम काय होणार?

दुर्देवाने ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सलामीला कोण येणार, असा यक्ष प्रश्न टीम मॅनेजमेंटसमोर असणार आहे. त्यामुळे सलामीला कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा पहिला कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच डे नाईट मॅच खेळणार आहे. ही मॅच दोन्ही संघ पिंक (गुलाबी) बॉलने खेळतील.

संबंधित बातम्या :

Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, पहिल्या टेस्टमधून डेव्हिड वॉर्नर बाहेर

ind vs aus 2020-21 australia opener Will Pucovski ruled out 1st test match due to injurey

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.