IND vs WI: गुरनूर ब्रारचा थ्रो अन् सिराज घाबरला थेट मैदानावरच…, विराट, रोहितला हसू अनावर Video Viral
IND vs WI 3rd ODI: भारत वेस्ट इंडिज मालिका पार पडली आणि मालिका भारताने जिंकली, पण मॅच सुरु असताना सामन्यात जे घडलं त्यामुळे रोहित शर्माची रिएक्शनची चर्चा होत आहे.

IND vs WI ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका पार पडली जी भीरतीय संघाने २-१ ने जिंकली. वेस्ट इंडिजने शेवटचा सामना जिंकला. या सामन्यात एक मोठा अपघात टळला आहे. भर सामन्यात भारतीय खेळाडूची एक चीक महागात पडली असती. भर सामन्यात रोहित शर्मालाही रागवावं लागले. याचा व्हिडिओ आता जोरदरा व्हायरल होत आहे. नेमके काय घडले ते पाहा…
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये टीम इंडियाची फिल्डिंग सुरू असताना अपघात टळला आहे. गुरनूर ब्रारने केलेल्या थ्रो पासून मोहम्मद सिराज थोडक्यात बचावला नाही तर त्याला गंभीर दुखापत झाली असती. सिराज थेट मैदानात खाली वाकून झोपून राहिला नाही तर तर त्याला लागलं असते. मैदानामध्ये जेव्हा हे घडलं तेव्हा रोहित शर्माची रिएक्शन ही अगदी पाहण्यासारखी होती. मैदानात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Bachaao! 💀
Gurnoor Brar ke throw se bachne ke liye Siraj ne jo stunt kiya, uspe Rohit aur Virat ka has-has ke bura haal hai!
Loading...{{{html}}}Desi cricket masti is unmatched. 😂
#RohitSharma #ViratKohli https://t.co/jtgOazJTio— RAHUL KUMAR (@cricrahul_) October 3, 2026
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आणि मालिकाही जिंकली. यानंतर तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 351/7 एवढ्या धावा केला. 4 धावांवरच टीम इंडियाच्या 2 विकेट पडल्या होत्या. शुभमन गिल 1 धावांवर तर विराट कोहली पहिल्याच बॉलला शून्यावर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड आणि केएल राहुल यांनी भारताचा डाव सावरला आणि इतकी मोठी धावसंख्या उभारली.
भारतीय संघाने हा सामनाही जिंकला असता पण भारताची गोलंदाजी आणि फिल्डिंग अतिशय वाईट पाहायला मिळाली. खास करुन भारतीय संघाची डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी अतिशय वाईट होती. अंशुल कंबोजला कालच्या सामन्यात पदार्पण मिळाले होते. विराट कोहलीने त्याला कॅप दिली. पण अगदी पहिलाच सामना त्याच्यासाठी वाईट ठरला कारण त्याने खूप धावा दिल्या. नऊ ओव्हरमध्ये त्याने एकूण ८२ धावा दिल्या. अंशुल कंबोजसाठी पदार्पणाचा सामना एक वाईट स्वप्नासारखा असणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us