AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 1st T20 Update : टीम इंडियाची विजयी सलामी,ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय

या विजयासह टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

India vs Australia 1st T20 Update : टीम इंडियाची विजयी सलामी,ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय
| Updated on: Dec 04, 2020 | 5:50 PM
Share

कॅनबेरा : टीम इंडियाने  (Team India Tour Australia 2020-21)) पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अॅरॉन फिंचने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर डॉर्सी शॉटने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. मोईसेस हेनरिकेसनेही 30 धावा केल्या. टीम इंडियाकडून फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि पदार्पण केलेल्या थंगारासू नटराजनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहरने 1 विकेट घेतला.

त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी बाग पाडले. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. टीम इंडियाकडून केएल राहूलने सर्वाधिक 51 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 फोर आणि 1 सिक्स लगावला. तर रवींद्र जडेजाने 23 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने तडाखेदार नाबाद 44 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मोईसेस हेनरिकेसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. तर अॅडम झॅम्पा आणि मिचेल स्वीपसन या जोडीने प्रत्येकी 1 विकेट मिळवला. दरम्यान दुसरा टी 20 सामना 6 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. india tour australia 2020 ind vs aus 1st t20 international match live score update लाईव्ह स्कोअरकार्ड

[svt-event title=”टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय” date=”04/12/2020,5:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का” date=”04/12/2020,5:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का” date=”04/12/2020,5:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का” date=”04/12/2020,4:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का” date=”04/12/2020,4:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का” date=”04/12/2020,4:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान ” date=”04/12/2020,3:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाला पाचवा धक्का” date=”04/12/2020,2:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाला चौथा धक्का” date=”04/12/2020,2:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाला तिसरा धक्का” date=”04/12/2020,2:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केएल राहुलचे 37 चेंडूत शानदार अर्धशतक” date=”04/12/2020,2:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाला मोठा धक्का” date=”04/12/2020,2:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला पहिला धक्का” date=”04/12/2020,1:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात” date=”04/12/2020,1:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”थंगारासू नटराजनचं एकदिवसीय क्रिकेटनंतर टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण” date=”04/12/2020,1:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला” date=”04/12/2020,1:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

आमनेसामने

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरोधात एकूण 9 टी 20 सामने खेळले आहेत. या 9 पैकी 5 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर 3 सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. तर उर्वरित एक सामना हा अनिर्णित राहिला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरोधात एकही टी 20 मालिका गमावलेली नाही.

हार्दिकच्या कामगिरीवर नजर

हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाविरोधात एकदिवसीय सामन्यात बॅटिंगने धमाकेदार कामगिरी केली. हार्दिकने तीन एकदिवसीय सामन्यात एकूण 210 धावा केल्या हार्दिकने अनुक्रमे 90, 28 आणि नाबाद 92 धावा केल्या. त्यामुळे हार्दिककडून या टी 20 मालिकेतही अशाच प्रकारच्या दमदार फलंदाजीची अपेक्षा टीम इंडिया आणि क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.

वॉर्नर टी 20 मालिकेला मुकणार

ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका 2-0 च्या फरकाने जिंकली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विश्वास दुणावलेला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला दुखापतीमुळे टी 2o मालिकेला मुकावं लागलं आहे. वॉर्नरने आयपीएलच्या 13 व्या मोसमात दमदार फलंदाजी केली होती. मात्र आता वॉर्नर दुखापतग्रस्त आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाला या टी 2o मालिकेत वॉर्नरची उणीव भासणार आहे.

तुल्यबळ संघ

ऑस्ट्रेलिया आणि इंडिया दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका जिंकली आहे. तर टीम इंडियाने तिसरा आणि शेवटचा सामना जिंकला आहे. यामुळे दोन्ही संघांचा विश्वास मजबूत आहे. यामुळे या टी 20 मालिकेत विजयी आघाडी कोण घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि थंगारासू नटराजन.

टीम ऑस्ट्रेलिया: अॅरॉन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टन एगर, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट आणि अॅडम झॅम्पा.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020, 3rd ODI Updates | अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी मात

india tour australia 2020 ind vs aus 1st t20 international match live score update

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.