Ishan Kishan: बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम…भर कार्यक्रमात इशान किशन असं का म्हणाला? व्हिडिओ सर्वत्र चर्चा

Ishan Kishan Video Viral: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा टी-२० सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी ईशान किशनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Ishan Kishan: बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम...भर कार्यक्रमात इशान किशन असं का म्हणाला? व्हिडिओ सर्वत्र चर्चा
| Updated on: Sep 17, 2026 | 12:55 PM

भारत आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंमध्ये पूर्वीपासूनच घट्ट मैत्री आहे. आयपीएलमध्ये एकत्र खेळल्याने दोन्ही संघांतील खेळाडूंमधील नाते अधिक घट्ट झाले आहे. सध्या दिल्लीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-२० मालिका खेळली जात आहे. सामना दिल्लीत खेळला जात असला तरी, अफगाणिस्तान संघ या सामन्याचे यजमानपद भूषवत आहे. बुधवारी नवी दिल्लीत आयोजित अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ‘कोह-ए-जफर’ कार्यक्रमात या मैत्रीची एक झलक पाहायला मिळाली. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

या कार्यक्रमादरम्यान, भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशन, कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर अभिषेक शर्मा यांनीही प्रश्नांची उत्तरे दिली. अफगाणिस्तानचे मोहम्मद नबी, गुलबदिन नायब आणि कर्णधार इब्राहिम झद्रान मंचावर उपस्थित होते. ईशान किशनला विचारण्यात आले, “अफगाण खेळाडूंची अशी कोणती आवड आहे जी तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित करते?” प्रश्नाचे उत्तर देताना, इशान किशन एका अफगाण खेळाडूच्या शैलीत म्हणाला, “सर्वप्रथम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम.” हे ऐकून, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर अभिषेक शर्मा यांच्यासह मंचावर उपस्थित असलेले अफगाण खेळाडू खळखळून हसले. प्रेक्षकांनाही हसू आवरता आले नाही.

इशान किशनने अफगाण खेळाडूंचे कौतुक करत म्हटले, “त्यांच्याविरुद्ध खेळायला नेहमीच मजा येते, कारण आमच्यापैकी बरेच जण आयपीएलमध्ये एकत्र खेळलो आहोत आणि ते किती चांगले लोक आहेत हे आम्हाला माहीत आहे. त्यांच्याकडून नेहमीच काहीतरी शिकायला मिळते. मी विशेषतः मुंबई इंडियन्समध्ये नबी भाईंसोबत खेळलो आहे आणि फलंदाजीच्या सरावादरम्यान त्यांची खूप मदत व्हायची. वेगवेगळ्या गोलंदाजांचा सामना करताना ते अनेकदा नियोजन आणि रणनीतीबद्दल आपली मते मांडायचे. अफगाणिस्तान संघाचा सर्वात प्रभावी गुण म्हणजे त्यांची विजयाची भूक आणि दृढनिश्चय. जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध खेळतो, तेव्हा ते विकेट्स घेण्यासाठी आणि सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्यासाठी किती उत्सुक आहेत हे स्पष्ट दिसते.” भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा सामना आज दिल्लीत रंगणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us