AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही येत नसतो, जा काय करायचं ते करा…पाकड्यांनी भारताला पुन्हा दाखवला माज, काय घडलं?

Pakistan Hockey Team: पाकिस्तानने आपला पुरुष हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एक मोठाल निर्णय घेतला आहे ज्याची आता जोरदार चर्चा सुरु आहे.

आम्ही येत नसतो, जा काय करायचं ते करा...पाकड्यांनी भारताला पुन्हा दाखवला माज, काय घडलं?
| Updated on: Sep 17, 2026 | 12:25 PM
Share

पाकिस्तानने आपला पुरुष हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाठवण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान हॉकी महासंघाने (PHF) आशियाई हॉकी महासंघाला (AHCF) संपूर्ण किंवा स्पर्धेचा काही सामने तटस्थ ठिकाणी हलवण्याची विनंती केली आहे. पाकिस्तान हॉकी महासंघाने (PHF) म्हटले आहे की, “पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा सहभाग सुरळीत आणि पूर्ण व्हावा यासाठी त्यांना तटस्थ ठिकाण हवे आहे. संपूर्ण स्पर्धा किंवा पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी हलवण्याची विनंती केली आहे.”

अध्यक्ष मोहिउद्दीन अहमद वानी यांनी निवेदनात म्हटले आहे, “पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सध्याची संवेदनशील द्विपक्षीय परिस्थिती आणि सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि अनुकूल वातावरण सुनिश्चित करणे हा याचा उद्देश आहे. ” पाकिस्तान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक स्तरावर हॉकीच्या प्रचारासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

वानी म्हणाले, “आम्ही भारतासह सर्व एफआयएच सदस्य देशांचा मैदानावर सामना करण्यास तयार आहोत आणि खेळाला राजकारणापासून मुक्त ठेवण्याच्या तत्त्वासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्हाला प्रामाणिकपणे आशा आहे की, आशियाई हॉकी महासंघ स्पर्धेत पाकिस्तानचा सुरळीत आणि पूर्ण सहभाग सुनिश्चित करण्यासाठी तटस्थ स्थळाच्या आमच्या सन्माननीय प्रस्तावावर सकारात्मक विचार करेल.”

पीएचएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, सरकारने राष्ट्रीय संघाच्या भारत दौऱ्याला मंजुरी दिलेली नाही, यानंतर काही तासांतच ही घडामोड समोर आली आहे. हे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दाव्याच्या विरोधात आहे. मान यांनी, हॉकी इंडियाचे सचिव भोला नाथ सिंग यांच्यासह, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच्या सहभागाची पुष्टी केली होती. त्यांनी यावर जोर दिला होता की, भारताचे क्रीडा धोरण पाकिस्तानला देशात आयोजित बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देते. सुरक्षेच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत पाकिस्तानने गेल्या वर्षी तामिळनाडूमध्ये झालेल्या एफआयएच ज्युनियर विश्वचषक आणि आशिया चषकातूनही माघार घेतली होती.

Follow Us
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट