AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Vs England 2nd ODI Live Streaming : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा वन डे सामना, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

India Vs England 2nd ODI Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे.

India Vs England 2nd ODI Live Streaming : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा वन डे सामना, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
India Vs England 2nd ODI
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 26, 2021 | 10:08 AM
Share

पुणेटीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India Vs England 2nd ODI) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. पुण्याच्या एमसीए क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना पार पडणार आहे. भारतीय संघाने इंग्लंडला पहिल्या सामन्यात 66 धावांनी पराभूत करुन मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी विजयी सलामी नोंदवली आहे. आजही दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज विजय नोंदवून मालिका खिशात घालण्याचा भारत पुरेपूर प्रयत्न करेन. (India Vs England 2nd ODI When And Where Do Watch Live Streaming)

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मधल्या फळीतील बॅट्समन श्रेयस अय्यर (shreyas iyer) दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्याला पहिल्या मॅचदरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. अय्यरच्या जागी कुणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. अय्यरच्या जागी सूर्यकुमारला संधी मिळू शकते, असा अंदाज आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे.

सामना कुठे खेळवण्यात येणार?

या सामन्याचे आयोजन पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.

मॅच कुठे पाहता येणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येणार आहेत. सोबतच tv9marathi.com या आमच्या वेबसाईटवर तुम्हाला सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.

सामना मोबाईलवर पाहता येणार का?

हॉटस्टार आणि जियो टीव्हीवर सामना ऑनलाईन पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी असणार का?

कोरोना संसर्गाच्या पार्शअवभूमीवर या सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी नसणार आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडची टीम

इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, जॅक बॉल आणि डेव्हिड मलान.

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या :

Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यर इंग्लंडविरोधातील दोन्ही वनडे सामन्यातून बाहेर, आयपीएलला मुकणार?

India vs England 2021, 1st odi | टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल, इंग्लंडवर 66 धावांनी शानदार विजय

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...