चोप चोप चोपलं… श्रेयस अय्यरची बहीण संतापली, कथित बॉयफ्रेंडला बुटाने चोपलं; पाहा Video

भारतीय क्रिकेटर श्रेयस अय्यर हा मागील काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. मात्र त्याची एशिया कप टीममध्ये निवड न झाल्याने अनेकांनी टीका केली. आता श्रेयस अय्यर याच्या बहिणीचा हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क रस्त्यावर एका मुलाला मारताना दिसत आहे.

चोप चोप चोपलं... श्रेयस अय्यरची बहीण संतापली, कथित बॉयफ्रेंडला बुटाने चोपलं; पाहा Video
shreyas Iyer sister
| Updated on: Aug 20, 2025 | 3:35 PM

श्रेयस अय्यर हा कायमच चर्चेत असतो. विशेष म्हणजे फक्त तोच नाही तर त्याची बहिणही चर्चेत असते. आता थेट श्रेयस अय्यर याच्या बहिणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये श्रेयशची बहीण चक्क कथित बॉयफ्रेंडला बुटाने मारत आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. धक्कादायक म्हणजे प्रवासादरम्यान तिने ही मारहाण केली. त्याचे कारणही स्पष्ट होत आहे. श्रेयसच्या बहिणीचे नाव श्रेष्ठा अय्यर आहे. श्रेष्ठा ही तिचा कथित बॉयफ्रेंड आणि अजून काही लोकांसोबत कोल्हापूरला निघाली.

यावेळी कोल्हापूरला निघण्याच्या अगोदर श्रेष्ठाने एक अट घातली, जी तिच्या कथित बॉयफ्रेंडने मान्य देखील केली. मात्र, त्याने ती अट पूर्ण केली नसल्याने श्रेयशची बहीण इतकी जास्त चिडली की, तिने थेट बुटाने त्याला जोरदार मारहाण केली. हैराण करणारे म्हणजे तिने थेट रस्त्यावरच मारहाण केली. श्रेष्ठाने एकदा दोनदा नाही तर तब्बल सहा वेळा बुटाने कथित बॉयफ्रेंडला धुतले. त्यानंतर तो पळत असतानाही ती बुट घेऊन मारण्यासाठी त्याच्या मागे धावली.

गाडीमध्ये बसण्याच्या अगोदर श्रेष्ठाने एक मोठी अट ठेवली की, कोल्हापूरला जाताना गाडीमध्ये ज्याला झोप येत नाही, त्यालाच मी माझ्या शेजारी बसेल. त्यानंतर कथित प्रियकराने ही अट मान्य केली आणि गाडीमध्ये तिच्या बाजूच्या सीटवर बसला. मात्र, गाडी सुरू झाल्यानंतर तो इतका जास्त झोपला की, थेट कोल्हापूरमध्ये पोहोचल्यावर सकाळीच उठला. त्यानंतर तो गाडीच्या खाली उतरत आळस देत म्हणतो की, नाश्त्यासाठी थांबलो आहोत का?

त्याचे हे सर्व बोलणे ऐकून श्रेयस अय्यरच्या बहिणीचा पारा चढतो आणि ती चक्क पायातील बूट काढून कथित बॉयफ्रेंडला मारते. आता याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. श्रेयस अय्यर याची बहीण श्रेष्ठा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. अशाप्रकारचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.