AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : यंदाचा आयपीएल हंगाम MS धोनीसाठी शेवटचा? पाहा पाठीमागच्या वर्षी धोनी काय म्हणाला होता?

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यंदाच्या आयपीएल मोसमानंतर क्रिकेटला कायमचा गुडबाय करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

IPL 2021 : यंदाचा आयपीएल हंगाम MS धोनीसाठी शेवटचा? पाहा पाठीमागच्या वर्षी धोनी काय म्हणाला होता?
MS Dhoni Chennai Super Kings
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Apr 06, 2021 | 7:32 AM
Share

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यंदाच्या आयपीएल मोसमानंतर क्रिकेटला कायमचा गुडबाय करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आयपीएलचं रण (IPL 2021) सज्ज असताना या चर्चांनी जोर धरलाय. यापाठीमागे काही समीकरणे असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच ही समीकरणं खोडून काढणारे नवीन दावेही केले जात आहे.  (IPL 2021 MS Dhoni Last Season For Chennai Super Kings, What Dhoni had said last year)

यंदाचा आयपीएल हंगाम MS धोनीसाठी शेवटचा?

यंदाचा आयपीएल हंगाम MS धोनीसाठी शेवटचा असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचं कारण आहे 2022 साली आयपीएलचं मेगा ऑक्शन… पुढील वर्षी या स्पर्धेत एक नवीन संघ दाखल केला जाईल. अशा परिस्थितीत सर्व खेळाडूंवर लिलाव लागेल. आत्ता संघासोबत असणाऱ्या काही खेळाडूंना कायम ठेवल्यानंतर उर्वरित बोली लावण्यात येईल. याचा अर्थ असा आहे की सर्व संघांची रचना बदलली जाईल.

आतापर्यंत धोनीच्या कारकीर्दीवर नजर टाकल्यास तो संघावर ओझं ठरण्याचं निमित्त शोधणार नाही. कारण त्याला संघात कायम ठेवल्यास सीएसकेला त्यांच्या बजेटचा मोठा पैसा खर्च करावा लागतो. मग संघात ठेवल्यानंतरी तो किती वर्षे खेळेल असा प्रश्न आहे. ही सगळी अनिश्चितता पाहता पुढील हंगामात धोनी फलंदाजी करताना दिसण्याची शक्यता नाही.

पाठीमागील वर्षी धोनी काय म्हणाला होता?

पाठीमागच्या आयपीएल मोसमात सीएसकेची कामगिरी अतिशय निराशजनक झाली. बाद फेरीच्या अगोदरच त्यांना आयपीएलमधील आपला गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर डैनी म़ॉरिसन यांनी एम धोनीला हा तुझा शेवटचा आयपीएल हंगाम आहे का?, असं विचारल्यानंतर डेफिनेटली नॉट, असं आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेलं उत्तर धोनीने दिलं होतं.

आयपीएल-13 हंगाम धोनीसाठी सर्वात खराब

आयपीएल 2020 मध्ये महेंद्रसिंग धोनीची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. त्याला 14 सामन्यात 200 धावा करता आल्या. नाबाद 47 धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. संपूर्ण स्पर्धेत त्याला सात षटकार मारता आले. त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकीर्दीतील हा सिझन सर्वांत खराब होता.

(IPL 2021 MS Dhoni Last Season For Chennai Super Kings, What Dhoni had said last year)

हे ही वाचा :

IPL 2021 : ‘कॅप्टन माही’चा धडाकेबाज अवतार, सराव करताना एका हाताने षटकार, व्हिडीओ व्हायरल

डेव्हिड वॉर्नर म्हणाला ‘बोअर होतंय…’, रोहित म्हणाला, ‘का बरं, Tik Tok ला मिस करतोय?’ दोन खेळाडूंमधला मजेशीर संवाद!

IPL 2021 : आयपीएलमधील सर्वोत्तम 6 इनिंग्स कोणत्या? ज्यामध्ये झाली चौकार-षटकारांची लयलूट!

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं