AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कबड्डीपटूंची ‘ऑनलाईन’ फसवणूक

मिनाक्षी म्हात्रे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : सध्या जगात सर्वच काही ऑनलाईन झालं आहे. मग ते जॉबसाठी असो किंवा इतर कुठल्या सरकारी कामासाठी. तसेच खेळही आता ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच खेळांचे फॉर्म ऑनलाईन भरले जातात. सध्या प्रो कबड्डी सुरू आहे, त्यात काही खेळांच्या ऑनलाईन जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. अशाच एका काबड्डीच्या जाहिरातीमुळे काही […]

कबड्डीपटूंची ‘ऑनलाईन’ फसवणूक
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

मिनाक्षी म्हात्रे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : सध्या जगात सर्वच काही ऑनलाईन झालं आहे. मग ते जॉबसाठी असो किंवा इतर कुठल्या सरकारी कामासाठी. तसेच खेळही आता ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच खेळांचे फॉर्म ऑनलाईन भरले जातात. सध्या प्रो कबड्डी सुरू आहे, त्यात काही खेळांच्या ऑनलाईन जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. अशाच एका काबड्डीच्या जाहिरातीमुळे काही खेळाडूंची फसवणूक झाली आहे.

मुंबईच्या एनएससीआय मैदानात कबड्डीच्या निवडीसाठी आलेल्या खेळाडूंची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ही मुले वेगवेगळ्या राज्यांतून मुंबईत आली होती. मैदानात पोहोचल्यानंतर तिथे कुठलीही निवड प्रक्रिया नसून, त्यांची फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. 100 हून अधिक खेळाडू मुंबई बाहेरून या निवडीसाठी आले होते. त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन पैसे भरले होते, ज्यानंतर ईमेलमार्फत निवड प्रक्रियेची तारीख खेळाडूंना कळवण्यात आली होती.

जेव्हा हे खेळाडू एनएससीआय मैदानात पोहोचले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर काही कळायच्या आतच या खेळाडूंना मैदानातून बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे खेळाडू संतप्त झाले. या संतप्त खेळाडूंनी ताडदेव पोलीस ठाण्यात धाव घेतली, पण जिथे रजिस्ट्रेशन झालंय तिथेच याची तक्रार केली जाऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. ज्यानंतर हे खेळाडू आपआपल्या राज्यात परत जाऊन तक्रार करणार आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी, तसेच या मागील फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी खेळाडूंनी केली आहे.

ऑनलाईन फसवणूक झलेल्या लोकांसाठी सायबर व सायबर एक्स्पर्टकडून आवाहन :

“जर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर अगोदर त्या वेबसाईटची पडताळणी करून घ्या. सध्या या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असून, आता लोकांनी सावध होण्याची गरज आहे.”

Follow Us
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्
Tiger Shroff Case : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट समोर; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्.....
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस