MI Head Coach Announcement : मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल, माहेला जयवर्धनेच्या जागी नव्या हेड कोचच्या नावाची घोषणा

MI Head Coach Announcement : मुंबई इंडियन्सच्या संघ रचनेत महत्वाचा बदल झाला आहे. काही दिवसांपूर्वी माहेला जयवर्धने यांनी हेड कोच पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांच्याजागी नव्या हेड कोचच्या नावाची घोषणा झाली आहे.

MI Head Coach Announcement : मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल, माहेला जयवर्धनेच्या जागी नव्या हेड कोचच्या नावाची घोषणा
mahela jayawardene
Image Credit source: twitter/mi
| Updated on: Oct 24, 2026 | 12:16 PM

काही दिवसांपूर्वी माहेला जयवर्धने यांनी मुंबई इंडियन्सच्या हेड कोच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणार? याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली होती. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. मुंबई इंडियन्सने नव्या हेड कोचच्या नावाची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजचा माजी ऑलराऊंडर कायरन पोलार्डला मुंबई इंडियन्सचं हेड कोच बनवण्यात आलं आहे. कायरन पोलार्डचं मुंबई इंडियन्स सोबत जुनं नातं आहे. कायरन पोलार्ड आधी मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू होता. त्याने आयपीएल 2023 मध्ये निवृत्ती घेतली. मागचे चार सीजन तो बॅटिंग कोच होता. आता कायरन पोलार्ड हेड कोच म्हणून माहेला जयवर्धनेची जागा घेणार आहेत.

कायरन पोलार्ड सर्वप्रथम 2010 साली मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल झाला. आयपीएलमध्ये मुंबईच्या प्रत्येक विजयाचा तो साक्षीदार होता. मुंबई इंडियन्सनेच 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 एकूण पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला. कायरन पोलार्ड त्या सर्व विजयांमध्ये टीमचा भाग होता. त्याशिवाय मुंबई इंडियन्सने 2011 आणि 2013 अशी दोनवेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्या दोन्ही विजयात पोलार्डची टीममध्ये महत्वाची भूमिका होती.

Loading...

आयपीएलमध्ये पोलार्डचं प्रदर्शन कसं आहे?

एक खेळाडू म्हणून कायरन पोलार्डने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी शानदार प्रदर्शन केलं. तो फ्रेंचायजीसाठी एकूण 189 सामने खेळला. त्यात 147.32 च्या स्ट्राइक रेटने 3412 धावा केल्या. त्याशिवाय त्याने 69 विकेटही काढले. कायरन पोलार्ड आयपीएलमध्ये शेवटचा सामना 2022 च्या सीजनमध्ये खेळला होता. त्यानंतर टीमचा तो बॅटिंग कोच बनला. आता हेड कोचच्या भूमिकेत दिसणार आहे.

पोलार्डवर आता महत्वाची जबाबदारी काय?

पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आला, त्यावेळी तो फक्त 22 वर्षांचा होता. 16 वर्ष MI फ्रेंचायजीचा महत्वाचा सदस्य होता. डिसेंबर महिन्यात गोव्यामध्ये खेळाडूंचं ऑक्शन होणार आहे. त्याआधी रिटेन खेळाडूंची लिस्ट बनवण्याची पोलार्डवर महत्वाची जबाबदारी असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us