कोल्हापूरच्या अनिकेत जाधवची UAE मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघात निवड

| Updated on: Oct 14, 2021 | 1:33 PM

कोल्हापूरचा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याची 23 वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघात निवड करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 23 ते 31 ऑक्‍टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी (AFC U-23 Asian Cup) अनिकेतची निवड करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या अनिकेत जाधवची UAE मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघात निवड
Aniket Jadhav
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापूरचा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याची 23 वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघात निवड करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 23 ते 31 ऑक्‍टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी (AFC U-23 Asian Cup) अनिकेतची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघात निवड होणारा अनिकेत हा कोल्हापुरातील पहिलाच फुटबॉलपटू आहे. अनिकेत जाधवच्या निवडीने कोल्हापूरच्या फुटबॉल परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. (Aniket Jadhav from Kolhapur selected for Indian Under-23 football team for AFC U-23 Asian Cup)

23 वर्षांखालील भारतीय संघ एएफसी अंडर -23 आशियाई चषक उझबेकिस्तान 2022 (AFC U-23 Asian Cup Uzbekistan 2022) साठी त्यांच्या पात्रता मोहिमेला सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे, 25 ते 31 ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या फुजैराह (Fujairah) येथील फुजैरा स्टेडियमवर सामने होणार आहेत. भारतीय संघ 17 ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये एकत्र होईल. त्यानंतर संघ 20 ऑक्टोबरला यूएईला रवाना होईल.

AFC U-23 Asian Cup साठी भारताच्या संभाव्य 28 खेळाडूंची यादी

गोलरक्षक (Goalkeepers) : धीरज सिंह मोइरंगथेम, प्रभुसुख सिंह गिल, प्रतीक कुमार सिंह, मोहम्मद नवाज.

बचावपटू (Defenders) : नरेंद्र गहलोत, बिकास युम्नम, अॅलेक्स साजी, होर्मीपम रुईवा, हॅलेन नोंगट्डू, आशिष राय, सुमित राठी, आकाश मिश्रा, साहिल पवार.

मध्यफळी (Midfielders) : एसके साहिल, सुरेश सिंह, अमरजीत सिंह, लेलेंगमाविया, जेकसन सिंह, दीपक टांगरी, राहुल केपी, कोमल थटल, निखिल राज, ब्रायस मिरांडा, प्रिन्स्टन रेबेलो.

फॉरवर्ड्स (Forwards) : विक्रम प्रताप सिंह, रहीम अली, रोहित दानू, अनिकेत जाधव

इतर बातम्या

2022 कॉमनवेल्थ गेम्समधून भारतीय हॉकी संघाची माघार, ‘या’ कारणामुळे घेतलं नाव मागे

PKL 8: कबड्डी, कबड्डी, कबड्डी! प्रो लीग कबड्डीच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात

गोल्डन बॉय नीरज चोप्रा दुबईत करतोय मजा-मस्ती, इन्स्टावर पोस्ट केलेले PHOTO पाहाच!

(Aniket Jadhav from Kolhapur selected for Indian Under-23 football team for AFC U-23 Asian Cup)