PKL 8: कबड्डी, कबड्डी, कबड्डी! प्रो लीग कबड्डीच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात

भारताच्या मातीतला खेळ अशी ओळख असलेल्या कबड्डीकडे नव्या पिढीला पुन्हा आकर्षून घेणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या आगामी आठव्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे.

PKL 8: कबड्डी, कबड्डी, कबड्डी! प्रो लीग कबड्डीच्या तारखा जाहीर, 'या' दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात
प्रो कबड्डी लीगच्या सामन्यांना लवकरच सुरुवात होणार आहे.
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 4:26 PM

मुंबई: भारताचा हक्काचा खेळ असणाऱ्या कबड्डीचे पुन्हा सर्वांना वेड लावले ते प्रो कबड्डी लीगने. मातीतला हा रांगडा खेळ मॅटवर खेळवला जाऊ लागला असला तरी त्याची चुरस आणि मजा मात्र कमी झालेली नाही. दरम्यान याच प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या पर्वाला दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा सुरुवात होणार आहे.  22 डिसेंबरपासून बंगळुरु येथे या खेळाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.

दरम्यान कोरोनाचं संकट अजूनही असल्याने प्रे्क्षकांना मात्र प्रत्यक्षात सामना पाहता येणार नाही. त्यामुळे या सामन्यांची मजा टेलिव्हिजनवरच घ्यावी लागेल.  PKL चे आयोजक मशाल स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंच्या प्रकृतीच्या काळजीसाठी प्रेक्षकांना परवानगी दिली नसल्याचं सांगितलं आहे. 2019 नंतर कोरोनाच्या संकटामुळे लीग होत नव्हती. 2021 च्या सुरुवातीला सामने होणार होते. पण पुन्हा कोरोनाच्या संकटामुळेच ही स्पर्धा कॅन्सल करण्यात आली होती. पण आता सुरक्षेची सर्व काळजी घेऊन ही स्पर्धा सुरु होणार आहे.

बंगळुरुमध्ये होणार सामने

या स्पर्धेचे सामने खेळवण्यासाठी आधी अहमदाबाद आणि जयपुर या शहरांचा विचार करण्यात आला होता. पण अखेर बंगळुरुला यजमानपद सोपवण्यात आलं आहे. सर्व कोरोनासंबधी नियमांचे पालन करु बायो बबलच्या नियमांनुसार हे सामने पार पडणार आहेत. यंदा या लीगमध्ये 12 संघ समाविष्ट होणार आहेत. ऑगस्टमध्येच खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. प्रदीप नरवाल हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. यूपी योद्धा संघाने 1.65 कोटींना त्याला विकत घेतलं.

हे ही वाचा

T20 World Cup 2021 च्या सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत मोठा निर्णय, ICC ने दिली माहिती

IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय, गुणतालिकेतही मिळवलं अव्वल स्थान

PHOTO: गोल्डन बॉय नीरज चोप्राचा रॉयल लूक, पारंपरिक वेशभूषेत खास फोटोशूट

(Pro kabaddi league season 8 Will start on december 22 see PKL 8 dates)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.