FIFA WC 2026 स्पर्धेत वापरल्या जाणाऱ्या फुटबॉलमध्ये चिप! स्पर्धेपूर्वी करणार चार्ज, रेफरीला होणार थेट मदत

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना फुटबॉलबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत वापरला जाणारा फुटबॉल खास असणार आहे. कारण या फुटबॉलमध्ये चिप असणार आहे. कसं काम करणार ते जाणून घेऊयात

FIFA WC 2026 स्पर्धेत वापरल्या जाणाऱ्या फुटबॉलमध्ये चिप! स्पर्धेपूर्वी करणार चार्ज, रेफरीला होणार थेट मदत
FIFA WC 2026 स्पर्धेत वापरल्या जाणाऱ्या फुटबॉलमध्ये चिप! स्पर्धेपूर्वी करणार चार्ज, रेफरीला होणार थेट मदत
Image Credit source: fifa world cup twitter
| Updated on: May 27, 2026 | 4:30 PM

फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा महाकुंभ 12 जूनपासून सुरू होणार आहे. जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून 48 संघ मैदानात उतरणार आहे. 20 जुलैला या स्पर्धेचा विजेता कोण ते कळेल. ही स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोत होणार आहे.. असं असताना या स्पर्धेपूर्वी काही भाकीतं वर्तवण्यात आली आहे. त्यात फुटबॉल संदर्भात एक रंजक माहिती समोर आली आहे. फुटबॉलमध्ये ‘ट्रायोंडा’ अत्याधुनिक तंत्रज्ञाना आणि सेंसरसह बसवण्यात येणार आहे. हा फुटबाॉल सामन्यापूर्वी चार्ज केला जाईल. चार्ज केल्यानंर जवळपास सहा तास काम करू शकेल. त्यामुळे सामन्यातील लाईव्ह डेटा मिळेल आणि रेफरींना तात्काळ निर्णय घेण्यास मदत होईल. ऑफसाईट आणि गोल लाईनसारख्या वादग्रस्त मुद्द्यावर आता व्हिडीओ असिस्टेंट रिव्ह्यूत या फुटबॉलची मदत होणार आहे. यामुळे योग्य आणि अचूक निर्णय घेण्यास मदत होईल.

फुटबॉलमधील सेंसर असं काम करणार

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत वापरल्या जाणाऱ्या फुटबॉलमध्ये एक हलका पॅनेल इंटिग्रेटेड सेंसर असेल. हा सेंसर चार्ज केल्यानंतर सहा तास चालणार आहे. म्हणजेच फुटबॉलचा खेळ 90 मिनिटांचा असतो आणि अतिरिक्त वेळ पकडला तर जवळपास 2 तास असेल. त्यामुळे सहा चालणाऱ्या सेंसरमुळे कुठेच काहीच अडचण येणार नाही. हा सेंसर स्टेडियममधील 12 कॅमेऱ्यांसह काम करणार आहे. त्यामुळे ऑपसाईड किंवा गोल लाइनशी निगडती निर्णय घेण्यास तात्काळ मदत होईल. कारण हा सेंसर लाईव्ह डेटा तात्काळा व्हीएआरकडे पाठवेल.

फुटबॉलमध्ये 500 हर्टज् मोशन सेंसर चिप असणार आहे. ही चिप एडिडास कंपनीने तयार केली आहे. ही चिप खूपच अत्याधुनिक असून प्रत्येक सेकंदाला 500 वेळा डेटा रेकॉर्ड करण्याची ताकद आहे. म्हणजेच फुटबॉलला टच झालं की झालं रेकॉर्ड सुरू होईल. आता हा फुटबॉल खेळताना काही वेगळा असेल का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्याचं उत्तर नाही असं आहे. हा आपल्या फुटबॉलसारखाच आहे आणि त्यात काहीच फरक नाही. यात फक्त 14 ग्रॅमचं सेंसर असेल आणि त्याचा खेळाडूंच्या कामगिरीवर काही एक परिणाम होणार नाही.

Follow Us