CWG 2026: कॉमनवेल्थमध्ये भारताचे दे दणादण गोल्ड! एकाच दिवसात जिंकले इतके मेडल, पदकतालिकेत मोठी झेप

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेची सांगता होत असताना भारतीय स्पर्धकांनी कमाल केली आहे. खासकरून भारतीय बॉक्सर्सनी सुवर्ण पदकाची लयलूट केली आहे. त्यामुळे भारताला पदकतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे.

CWG 2026: कॉमनवेल्थमध्ये भारताचे दे दणादण गोल्ड! एकाच दिवसात जिंकले इतके मेडल, पदकतालिकेत मोठी झेप
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 01, 2026 | 10:09 PM

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत शनिवारचा दिवस खास ठरला. कारण भारतीय स्पर्धकांनी या दिवसात एका पाठोपाठ एक गोल्ड मेडल मिळवले. त्यामुळे भारताचं पदकतालिकेतील गुणांकन जबरदस्त सुधारलं असून दहाव्या स्थानावरून टॉप 5 मध्ये झेप घेतली आहे. बॉक्सिंगमध्ये भारताने आपला विजयी झेंडा रोवला आहे. काही सामन्यात भारतीय स्पर्धक मागे पडले. पण पराभव झाल्यानंतरही रौप्य पदकाची कमाई केली हे विशेष.. त्यामुळे भारताने शनिवारी पदकांची लयलूट केली असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. बॉक्सर प्रीति पवार, जास्मिन लांबोरिया, सोमान राणा, प्रिया घणसस आणि साक्षी चौधरी यांनी त्यांच्या वजनी गटात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.

सुवर्ण कामगिरी करणारे खेळाडू

प्रीति पवारने महिलांच्या 54 किलो वजनी गटात पहिल्या फेरीपासून आक्रमकता दाखवली. त्यामुळे कॅनडाची स्कार्लेट डेलगाडो पूर्णपणे हतबल दिसली. प्रीतिने हा सामना 5-0 ने जिंकला आणि गोल्ड मिळवलं. त्यांतर जास्मिन लांबोरियाने 57 किलो वजनी गटात उत्तर आयर्लंडच्या एमी ब्रॉडहर्स्ट वॉल्शला हिला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात जास्मिनने 5-0 ने एकतर्फी सामना जिंकला. 51 किलो वजनी गटात साक्षी चौधरीने आणखी एक गोल्ड मिळवून दिलं. तिने अंतिम फेरीत इंग्लंडच्या बॉक्सर रुबी व्हाईटचा 5-0 ने पराभव केला. प्रिया घणसस हिनेही 60 किलो वजनी गटात 5-0 ने विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली. तिने कॅनडाच्या मेरी-बाथौलला लोळवलं. तर सोमण राणाने पॅरा एथलेटिक्स स्पर्धेत पुरुष शॉटपुट F57 मध्ये 13.40 मीटरचा सर्वोत्तम थ्रो फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं.

रौप्य पदकाचे मानकरी

जादुमणी सिंग याने बॉक्सिंगमध्ये पुरूषांच्या 55 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. जादुमणीने जोरदार टक्कर दिली, पण डिक्सनचे वेगवान पंचेस आणि बचावात्मक तंत्र सरस ठरल्याने जादुमणीला हार पत्कारावी लागली. शुभम जुयालला पॅरा-ॲथलेटिक्स – पुरुष शॉटपुट F57 गटात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. शुभमने 13.28 मीटर अंतरावर गोळा फेकत उत्कृष्ट कामगिरी केली. प्रवीण चित्रवेलने एथलेटिक्स पुरुष ट्रिपल जंपमध्ये 16.58 मीटरची लांब उडी मारली आणि भारताला रौप्य पदक मिळवून दिलं.

सेल्वा प्रभू थिरुमारन याने एथलेटिक्स पुरुष ट्रिपल जंप स्पर्धेत 16.52 मीटर अंतरावर झेप घेत तिसरे स्थान पटकावले आणि भारताच्या खात्यात कांस्य पदक जमा केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us