आंतरराष्ट्रीय मराठमोळी धावपटू निकिता राऊत हिच्यावर तीन वर्षाचा बॅन; कोणत्या कारणामुळे झाली मोठी कारवाई?

| Updated on: Mar 04, 2023 | 8:30 AM

या पदार्थामुळे स्नायूंची ताकद वाढवण्यात मदत होते. दरम्यान, निकितावर तीन वर्षाची बंदी घालणअता आल्याने तिला कोणत्याही स्पर्धेत भाग घेता येणार नाहीये. तसेच तिला खेलो इंडियात मिळालेलं सुवर्णपदक आणि प्रमाणपत्रं परत करावं लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय मराठमोळी धावपटू निकिता राऊत हिच्यावर तीन वर्षाचा बॅन; कोणत्या कारणामुळे झाली मोठी कारवाई?
nikita raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : आंतरराष्ट्रीय मराठमोळी धावपटू निकिता राऊत हिच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे. डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यामुळे निकिता राऊतवर तीन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. नाडाने ही कारवाई केली आहे. निकिता ही नागपूरातील तिसरी खेळाडू, जिच्यावर डोपिंगविरोधी कारवाई करण्यात आलीय. नाडाने केलेली ही कारवाई निकिता राऊतसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. अॅथेलिटिक इंटिग्रिटी यूनिट (एआययू)ने फेब्रुवारीत त्यांच्या संकेतस्थळावर 11 संशयित खेळाडूंचीनावे टाकली होती. त्यात निकिताचंही नाव होतं. काल तिच्यावर थेट कारवाई करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी बंगळुरू येथे खेलो इंडिया यूनिव्हर्सिटी गेम्समध्ये निकिताने नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलं होतं. या स्पर्धेत तिने 500 मीटरच्या रनिंगमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंतर नाडाने तिच्या लघवीचा नमुना घेऊन त्याची तपासणी केली होती. या चाचणीत निकिताने प्रतिबंधित अ‍ॅनाबॉलिक स्टिरॉइड घेतल्याचे आढळून आले. हा पदार्थ स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वापरला जातो. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नाडाने निकितावर तीन वर्षांची बंदी घातली आहे.

हे सुद्धा वाचा

तो पदार्थ 30 वर्षासाठी बॅन

इंटरनॅशनल अॅथेलिटिक्स फेडरेशनने हा पदार्थ 30 वर्षासाठी बॅन केला आहे. या पदार्थामुळे स्नायूंची ताकद वाढवण्यात मदत होते. दरम्यान, निकितावर तीन वर्षाची बंदी घालणअता आल्याने तिला कोणत्याही स्पर्धेत भाग घेता येणार नाहीये. तसेच तिला खेलो इंडियात मिळालेलं सुवर्णपदक आणि प्रमाणपत्रं परत करावं लागणार आहे. या प्रमाणपत्राचा तिने दुरुपयोग करू नये म्हणूनही पावलं उचलली जाणार आहेत. दरम्यान, खेलो इंडियानंतर गेल्यावर्षी जूनमध्ये चेन्नईत आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्टेट अॅथेलिटिक्स चॅम्पियनिशीपमध्ये 5000 मीटर धाव स्पर्धेत निकिता 9 व्या स्थानावर होती.

डोपिंगचं जाळं जगभर

डोपिंगचं जाळं केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगात फैलावलेलं आहे. या डोपिंग प्रकरणात अनेक दिग्गज खेळाडूही अडकलेले आहेत. रियो ऑलिम्पिकपूर्वी आंतरराष्ट्रीय खेळ पंचाटने डोपिंगबाबत रशियाची अपील रद्द केली होती. त्यामुळे रशियाची ट्रॅक आणि फिल्ड टीम रियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकली नव्हती. एवढेच नव्हे तर बीजिंग ऑलिम्पिक 2008मध्ये 23 पदक विजेत्यांसह 45 खेळाडू डोप टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले होते.

सर्वात पहिलं प्रकरणं

सर्वात आधी 1968मध्ये ऑलिम्पिक खेळांमध्ये डोपिंग टेस्ट करण्यात आली. इंटरनॅशनल अॅथेलिटिक्स फेडरेशन ही पहिली संस्था होती, जिने 1928मध्ये डोपिंगबाबतचे नियम बनवले होते. 1966मध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पिक कौन्सिलने डोपिंगच्या चौकशीसाठी मेडिकल कौन्सिल तयार केली. डोप टेस्ट करणं एवढंच या कौन्सिलचं काम होतं.