Maharashtra Breaking News Live : संदीप देशपांडे हल्ला प्रकरण, आरोपींना 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

| Updated on: Mar 05, 2023 | 5:56 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : संदीप देशपांडे हल्ला प्रकरण, आरोपींना 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
Maharashtra News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे राज्यात ठिकठिकाणी पडसाद उमटत आहेत. मनसे कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी निषेधाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर चिंचवडमध्ये विजयी झालेल्या अश्विनी जगताप यांचं आज भाजपचे नेते चंद्रकांत पाटील अभिनंदन करणार आहेत. इयत्ता 12 वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Mar 2023 08:22 PM (IST)

    स्वस्तात सोने खरेदीची नागरिकांना संधी

    सरकारने आणली सुवर्ण रोखे योजना

    सोमवारपासून योजनेचा होणार श्रीगणेशा

    जोरदार मिळेल परताव्यासह मिळेल सरकारची हमी

    एक ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतील इतके रुपये, वाचा बातमी 

  • 04 Mar 2023 06:55 PM (IST)

    अदानी संकटात, या पठ्याने कमावले कोट्यवधी

    अदानी समूहाच्या शेअर्समधून बक्कळ नफा

    गुंतवणूकीची पत्करली मोठी जोखीम

    दोनच दिवसात मिळाला तगडा रिटर्न

    कोण आहेत NRI गुंतवणूकदार राजीव जैन? वाचा बातमी 

  • 04 Mar 2023 06:09 PM (IST)

    संदीप देशपांडे हल्ला प्रकरण, आरोपींना 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

    मुंबई : 

    संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे आरोपी अटकेत

    पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक

    चारही जणांना नऊ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

  • 04 Mar 2023 05:50 PM (IST)

    हा देश जगातील इतर देशांच्या छापतो नोटा

    जगभरातील अनेक देशांनी लावल्या रांगा

    या प्रिटिंग प्रेसमध्ये 18000 कर्मचारी करतात काम

    नोटा छपाईसाठी 10 प्लँटमध्ये दररोज काम सुरु

    अनेक देशाच्या अर्थसत्तेत आणि राजकीय सत्तेत थेट शिरकाव, वाचा बातमी 

  • 04 Mar 2023 04:57 PM (IST)

    गौतम अदानी यांच्यासाठी अच्छे दिन!

    अदानी समूहाने घेतली फिनिक्स भरारी

    समूहातील काही शेअर्सने घेतली उसळी

    दोन तासांत संपत्तीत पडली 11 अंकी भर

    अमेरिकेतील एका फर्मने केली मोठी गुंतवणूक, वाचा बातमी 

  • 04 Mar 2023 04:14 PM (IST)

    सप्तशृंगी गडावरील चोरी प्रकरण सुरक्षा रक्षकाविरोधात अखेर गुन्हा दाखल

    नाशिक : कळवण पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल,

    सीसीटीव्ही कॅमेरा वर चुना लावत दानपेटीतून काढले पैसे,

    विश्वस्तांच्या मागणीनंतर 20दिवसांनी गुन्हा दाखल.

  • 04 Mar 2023 04:10 PM (IST)

    नाशिक ः सप्तशृंगी गडावरील चोरी प्रकरण सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल

    कळवण पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल

    सीसीटीव्ही कॅमेरावर चुना लावत दानपेटीतून काढले पैसे

    विश्वस्तांच्या मागणीनंतर 20 दिवसांनी गुन्हा दाखल

  • 04 Mar 2023 03:41 PM (IST)

    महिलांसाठी खुशखबर ! दर महिन्याच्या 8 तारखेला पीएमपीचा मोफत प्रवास

    पुणे : पीएमपीचा गेल्या अनेक दिवसांपुर्वी बंद पडलेल्या ‘महिलादिनानिमित्त मोफत प्रवास’ हा उपक्रम आता पुन्हा सुरू,

    त्यानुसार महिलांना आता तेजस्विनी बसमध्ये दरमहिन्याच्या 8 तारखेला दिवसभर मोफत प्रवास करता येणार,

    त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण.

  • 04 Mar 2023 03:28 PM (IST)

    नाशिक

    नाशिकच्या जेलरोड परिसरात आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

    स्कूल व्हॅन मधून उतरून घरी जात असताना स्कूल व्हॅन ने चिरडले

    स्कूल व्हॅनचा चालक गाडी रिव्हर्स घेताना घडली घटना

    स्कूल व्हॅनच्या मागच्या टायर मध्ये आल्याने दुर्दैवी मृत्यू

  • 04 Mar 2023 01:53 PM (IST)

    सरकार विरोधात आवाज उठवला तर कारवाई होते; कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल

    सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जात आहे

    जनतेला जागृत करण्याची वेळ आलीय

    मला भाजपविरोधी नेत्यांनी साथ द्यावी

    देश संविधानावर न चालता धर्मावर चालतोय

  • 04 Mar 2023 01:51 PM (IST)

    Entertainment Update : तुनिषा शर्मा प्रकरणात शिझान खान याला दिलासा; इतक्या रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

    तुनिषा शर्मा प्रकरणातील मुख्य आरोपी शिझान खान याला दिलासा

    गेल्या अडीच महिन्यापासून अभिनेता होता ठाणे मध्यवर्ती कारागृहात... वाचा सविस्तर

  • 04 Mar 2023 01:48 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांची उद्या कोकणातील खेडमध्ये जाहीर सभा

    या सभेच्या तयारीसाठी ठाकरे गट सज्ज झाले आहेत

    खेड तालुक्यामधील गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे

    30 हजारहून अधिक कार्यकर्ते या सभेला हजेरी लावण्याचा अंदाज

    मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर राहतील म्हणूनच गोळीबार मैदानात ही सभा घेण्यात आली आहे

    गोळीबार मैदानाच्या सर्कलला हॅलोजन लावण्यात आले आहेत

    संपूर्ण सभा ही विद्युत रोषणाईने होणार आहे

    या सभेमध्ये गुहागर मतदारसंघातील बहुसंख्या कार्यकर्ते हे राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत

    राष्ट्रवादीचे माजी आमदार संजयराव कदम हे देखील याच मेळाव्यात ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत

  • 04 Mar 2023 01:31 PM (IST)

    संजय राऊत यांच्या जिभेला हाड व तोंडाला लगाम नाही - महाजन

    जळगाव : दररोज उठून कोणाला शिव्या घालतील कुणाला काय बोलतील

    संजय राऊत बेछूट सुटलेले आहेत.

    एक जागा जिंकली म्हणून फार मोठा तीर मारला असं समजण्याचं कारण नाही

    येणाऱ्या निवडणुका पुढे आहे तिथे शिवसेना काय दिवे लावते हे त्यांनी दाखवावे

    गिरीश महाजनांचा संजय राऊतांवर पलटवार

  • 04 Mar 2023 12:56 PM (IST)

    संगमनेर / अहमदनगर

    कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात ऑन मविआ 200 जागा

    मध्यंतरी एक सर्व्हे झाला त्यात मविआ एकत्र लढली तर लोकसभेच्या 34 जागा निवडून येतील कसबा हा भाजपचा बालेकिल्ला तरी तेथे धुळ खावी लागली चिंचवड मध्ये जरी आमचा पराभव झाला असला तरी दोघे उमेदवार आमचे दोघांच्या मताची बेरीज ‌केली तर 25 हजाराने मविआचा विजय झाला असता जनमत भाजप , शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात त्याचे परिणाम दिसण्यास सुरूवात

    ऑन शरद पवार ; देशात बदलाचे वारे

    बदल हा निश्चित आहे 2024 सालामध्ये मोठे बदल संपूर्ण देशाच्या राजकारणात झालेले दिसतील जे आता सुडाचे , दहशतीच वातावरण आहे महागाई , बेरोजगारी वाढलीय याचा एकत्र परिणाम 2024 मध्ये दिसेल

    ऑन देशपांडे हल्ला

    कोणावरही हल्ला झाला तर ते चुकीचं त्यामुळे शांतता सुव्यवस्था बिघडली हे स्पष्ट दिसतंय

    ऑन नाना पटोले

    कॉग्रेस मध्ये काय अंतर्गत राजकारण आहे ? जे तुम्ही प्रसिद्ध केलय तेच मला दिसतंय कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दिल्ली कॉग्रेस नेत्यांच्या भेटीवर थोरातांची प्रतिक्रिया

    ऑन राज्य सरकार

    सरकारमध्ये शेतक-यांच प्रतिनीधी कोण अशी म्हणण्याची वेळ आलीय परिणामत: ही अवस्था आहे शेतक-यांचे दुख : जाणून कोण घेणार ? भाषण मोठी करतात , त्यांची सुंदर भाषणे ऐकावेत भाषण करून पोट भरत नाही वस्तुस्थितीमध्ये नेमक काय अशी अपेक्षा आम्ही करत आहोत

    ऑन आंदोलन 

    आंदोलनाच्या माध्यमातुन शेतक-यांनी असंतोष व्यक्त केलाय कांदा कवडीमोल झालाय...सरकारने पाठीशी उभ रहायला हवं आमची ही मागणी

  • 04 Mar 2023 11:30 AM (IST)

    कांद्याचे भाव कोसळल्याने राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं रस्ता रोको आंदोलन

    अहमदनगर

    कांद्याचे भाव कोसळल्याने राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं रस्ता रोको आंदोलन

    तर निवेदन घेण्यासाठी तहसीलदार किंवा प्रांत येत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही

    कांद्याच्या दरावरून लंके आक्रमक, लाठीचार्ज झाला तरी चालेल मात्र रस्त्यावरून उठणार नाही

    नगर - पुणे महामार्गावर सुपा चौकात आंदोलन

    गेल्या अर्ध्यातासापासून आंदोलन सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प

    रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा

  • 04 Mar 2023 11:23 AM (IST)

    ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बनीज तीन दिवस भारताच्या दौऱ्यावर

    8 ते 11 मार्चपर्यंत त्यांचा हा दौरा असणार आहे

    या दौऱ्यामुळे दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध वाढणार

    अंथोनी हे पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर येत आहेत

    परराष्ट्र मंत्रालयाकडून या दौऱ्याची जय्यत अशी तयारी सुरू

  • 04 Mar 2023 11:07 AM (IST)

    केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट

    कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू

    मोदी सरकारने दिली होळीपूर्वीच भेट

    भाजप सरकार जुनी पेन्शन योजनेसाठी प्रतिकूल

    पण केंद्र सरकार या कर्मचाऱ्यांना पावले, वाचा बातमी 

  • 04 Mar 2023 10:55 AM (IST)

    रत्नागिरी 
    पत्रकार शशिकांत वारिसे संशयास्पद अपघाती मृत्यू प्रकरण
    आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा जामिनासाठी अर्ज
    पुढील आठवड्यात आंबेरकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणीची शक्यता
    सध्या आंबेरकरला न्यायालयीन कोठडी; एसआयटीमार्फत संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू
  • 04 Mar 2023 10:54 AM (IST)

    डोंबिवली

    विद्युत पोलावर एका अज्ञात इसमाने गळफास लावून केली आत्महत्या

    डोंबिवली स्टेशन परिसरातील धक्कादायक घटना

    कल्याण नंतर डोंबिवली स्टेशन परिसरात आत्महत्य

    स्टेशन परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

  • 04 Mar 2023 10:27 AM (IST)

    कोल्हापुरात झळकले धिस इस धंगेकरचे पोस्टर

    कोल्हापुरात झळकले धिस इस धंगेकर चे पोस्टर

    महाविकास आघाडीने ताराराणी चौकात लावला बॅनर

    मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात महाविकास आघाडी कडून बॅनरद्वारे प्रत्युत्तर

    स्वतःला गिरणी कामगाराचा मुलगा बनवणाऱ्या चंद्रकांत दादांनी धंगेकरांना मात्र तुच्छ लेखल

    महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांचा संताप

    कसबा पोटनिवडणुकीत हू इस धंगेकर असा चंद्रकांत दादांनी केला होता सवाल

    चंद्रकांत दादांच्या होम ग्राउंड वरच महाविकास आघाडी कडून झालेल्या बॅनरबाजी ने चर्चाना उधाण

  • 04 Mar 2023 10:23 AM (IST)

    सोने -चांदी झाले स्वस्त, खरेदीची संधी

    आठवडाभरात सोने झाले इतके स्वस्त

    चांदीच्या किंमतीत किलोमागे मोठी घसरण

    आठवड्यात सोने-चांदीच्या किंमतीत चढउतार

    उच्चांकी किंमतींपेक्षा इतक्या कमी झाल्या किंमती, वाचा बातमी 

  • 04 Mar 2023 09:57 AM (IST)

    माथेरानच्या ई रिक्षाचा आज शेवटचा दिवस

    ठाणे : ३ महिने प्रायोगिक तत्वावर सुरू होती ई रिक्षा,

    सर्वोच्च न्यायालयाने दिले होते ई रिक्षा चालवण्याचे निर्देश,

    माथेरानकरांची मात्र ई रिक्षा सुरू ठेवण्याची मागणी.

  • 04 Mar 2023 09:47 AM (IST)

    कांदा आणि वीज प्रश्नी महाविकास आघाडीच आक्रमक....

    संगमनेर / अहमदनगर

    कांदा आणि विजप्रश्नी महाविकास आघाडीच आक्रमक.... संगमनेर बस स्थानक येथे ठिय्या आंदोलन करत निदर्शनं.. कांद्याला हमीभाव मिळावा , शेतक-यांची विज तोड बंद करावी अशा विविध मागण्यांसदर्भात आंदोलन... डॉ.जयश्री थोरात आंदोलनात सहभागी... थोडयाच वेळात कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे देखील आंदोलनात होणार सहभागी... नाशिक - पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार...

  • 04 Mar 2023 09:35 AM (IST)

    एक कप चहात व्हा करोडपती

    केवळ 10 रुपयांच्या गुंतवणुकीतून होईल मोठा फायदा

    म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करेल मालामाल

    SIP च्या माध्यमातून दीर्घकालीन गुंतवणुकीतून लक्ष्य होईल साध्य

    एक कप चहा सोडा आणि श्रीमंत व्हा, वाचा बातमी 

  • 04 Mar 2023 08:45 AM (IST)

    नागपुरात 17 ठिकाणच्या छापेमारीत अनेक कागदपत्र ईडीच्या हाती

    अनेकांची फसवणुक करणाऱ्या पंकज मेहाडीयाच्या घराचीही झाडाझडती

    नागपुरात आर संदेश ग्रुपवर ईडीचं धाडसत्र

    रामदेव उर्फ रम्मु अग्रवाल यांचा घर आणि कार्यालयावर काल सकाळी ईडीची छापेमारी

    आर संदेश ग्रुपचे बांधकाम आणि औषध यासह अनेक क्षेत्रात गुंतवणूक

    नागपूरातील अनेक स्टील, लोहा, उद्योगातील गुंतवणूकदार ईडीच्या रडारवर

  • 04 Mar 2023 08:39 AM (IST)

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागले

    पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर काय झाला परिणाम

    काही शहरात भावात किंचित वाढ

    कर कपातीचा चर्चा पुन्हा थंड बस्त्यात

    मार्च महिन्यात केंद्र सरकार देणार का दिलासा? वाचा बातमी 

  • 04 Mar 2023 08:36 AM (IST)

    राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं संजय राऊत यांच्या विरोधात पत्र

    लहान मुलीचा फोटो शेअर केल्याने कारवाईची मागणी

    मनिष सिसोदिया यांच्या अटकेनंतर भाजपवर टिका करताना संजय राऊत यांनी लहान मुलीचा फोटो शेअर केल्याचा आरोच

  • 04 Mar 2023 08:20 AM (IST)

    यवतमाळ वणीत मनसेच्या आंदोलनाला हिंसक वळण

    यवतमाळ जिल्ह्यातील वणीत मनसेच्या वतीनं टायर जाळत तीव्र आंदोलन

    संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ विदर्भातील मनसेचा गड असलेल्या वणीत आंदोलन

    आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

    मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्त्वात मनसैनिकांचं विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन

    पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं

    संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद विदर्भातही दिसून आले

  • 04 Mar 2023 08:18 AM (IST)

    नागपुरात ६० संवेदनशील ठिकाणी पोलिसांद्वारे कोंबिंग ऑपरेशन

    होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्‍वभूमीवर कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलीस ॲक्शन मोडवर

    नागपूर शहरात ६ ते ८ मार्चदरम्यान ४० ठिकाणी बंदोबस्त

    होळीच्या पार्श्‍वभूमीवर नागपुरात ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह तपासणीची कारवाई मोहीम

    शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुख्य चौकात पोलीस नाकाबंदी मोहीम राबविणार

    शाळकरी मुला-मुलींचे वसतिगृह, महिलांच्या वसतिगृहाजवळ फिक्स पॉईंट, या परिसरात पोलीस सलग गस्त करणार

  • 04 Mar 2023 08:12 AM (IST)

    पुण्यात आठ मार्चपासून तेजस्विनी बस सेवा होणार सुरू

    पुणे

    पुण्यात आठ मार्चपासून तेजस्विनी बस सेवा होणार सुरू

    प्रत्येक महिन्याच्या आठ तारखेला महिलांना दिला जाणार मोफत प्रवास

    महिला दिनापासून पुणे महानगर परिवहन महामंडळाचा उपक्रम

    23 मार्गांवर धावणार 28 तेजस्विनी बसेस

  • 04 Mar 2023 07:57 AM (IST)

    आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर तीन वर्षांची बंदी

    डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आल्याने नाडाने घातली तीन वर्षांची बंदी

    निकिता ही नागपूरातील तिसरी खेळाडू, जिच्यावर डोपिंगविरोधी कारवाई करण्यात आलीय

    नुकतेच NADA ने धावपटूच्या लघवीचा नमुना घेऊन त्याची तपासणी केली

    निकिताने प्रतिबंधित अ‍ॅनाबॉलिक स्टिरॉइड घेतल्याचे तपासणीत आढळून आले

    हा पदार्थ स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वापरला जातो

    रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नाडाने निकितावर तीन वर्षांची बंदी घातली

  • 04 Mar 2023 07:22 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर फतियाबाद परिसरात भीषण अपघात

    छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गावर फतियाबाद परिसरात भीषण अपघात

    केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला

    ट्रक पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग

    आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक

    ट्रकमधील ड्रायव्हरसह सर्वांचा जळून मृत्यू झाला

    केमिकल ट्रक असल्यामुळे आग विझवण्यात अग्निशमनदलाला अपयश आले

    ट्रकमधील ड्रायव्हरसह इतरांना वाचवण्यातही अपयश आले

    ट्रक अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा आकडा अस्पष्ट

    मध्यरात्री उशिरा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला

  • 04 Mar 2023 07:13 AM (IST)

    नामांतर विरोधी एमआयएमच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना देना प्रत्युत्तर

    एमआयएमच्या आंदोलनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वाक्षरी मोहीम आंदोलन

    औरंगाबादच्या टीव्ही सेंटर चौकात मनसे करणार स्वाक्षरी मोहीम आंदोलन

    दुपारी 12 वाजता टीव्ही सेंटर चौकात आंदोलनाला होणार सुरुवात

    संभाजीनगर शहराच्या सन्मानासाठी मनसे करणारा स्वाक्षरी मोहीम आंदोलन

  • 04 Mar 2023 07:12 AM (IST)

    नागपूर जिल्हयात धुळवडीच्या दिवशी दारुविक्री बंद

    कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 7 मार्चला दारुविक्री बंद

    नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी जारी केला आदेश

    पोलीसांच्या आकडेवारीनुसार धुळवडच्या दिवशी अनेक गुन्हे घडतात

    त्यामुळे पोलीस विभागाच्या विनंतीवरुन नागपूर जिल्हयात धुळवडीच्या दिवशी दारुविक्री बंद

  • 04 Mar 2023 07:10 AM (IST)

    औरंगाबादच्या नामांतरावरून आज एमआयएमचे साखळी उपोषण आंदोलन

    खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत होणार साखळी उपोषण आंदोलन

    बेमुदत सुरू राहणार साखळी उपोषण आंदोलन

    आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला होणार सुरुवात

    एमआयएमचे हजारो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता

  • 04 Mar 2023 07:08 AM (IST)

    गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रात 8 वाघांचा मृत्यू

    देशात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात 34 वाघांचा मृत्यू

    मध्य प्रदेशामध्ये वाघाचे सर्वाधिक मृत्यू, त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे सर्वाधिक मृत्यू

    जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात 6 वाघांचा मृत्यू

    वाघाचे वाढते मृत्यू चिंतानजक, यावर तातडीने उपाययोजना गरजेची

    जगात सर्वाधिक वाघ भारतात, भारतात वाघांची संख्या 2 हजार 967

  • 04 Mar 2023 07:05 AM (IST)

    गोसेखुर्दचे पाणी पोहोचले घोडेझरी व खराशी तलावात

    भंडारा : गोसेखुर्दचे पाणी पोहोचले घोडेझरी व खराशी तलावात.

    33 वर्षांच्या कार्यकाळानंतर वर्षांनंतर पाणी मिळाल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे.

    नेरला लिफ्ट अंतर्गत मुख्य कालवा 43.80 किलोमीटरचा तयार करण्यात आला.

    12 पैकी 3 पंप सुरू करण्यात आले आहेत.दरम्यान हे फक्त प्रायोगीत तत्वावर सूरु असून वितरीकैचे काम पूर्ण झाल्यावर पुढील वर्षी पासून पाणी मिळणार आहे. त्यामुळे या भागातील शेती आता सुजलाम सुफलाम होणार आहे.

  • 04 Mar 2023 06:27 AM (IST)

    मनसे नेते संदीप देशपांडे आज पत्रकार परिषद घेणार

    काल झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे आज पत्रकार परिषद घेणार

    संदीप देशपांडे कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष

    देशपांडे यांच्या हल्ल्याप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मनसेने मागणी केली आहे

    त्यामुळे संदीप देशपांडे आज कुणावर आरोप करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

  • 04 Mar 2023 06:23 AM (IST)

    त्रिपुराचा पुढचा मुख्यमंत्री कोण? दोन नावे चर्चेत

    त्रिपुरातील मुख्यमंत्रीपदासाठी माणिक साहा आणि प्रतिमा भोमिक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे

    माणिक साहा हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत, तर प्रतिमा भौमिक या केंद्रीय मंत्री आहेत

    दोन दिवसात भाजपची संसदीय दलाची बैठक होणार, त्यात मुख्यमंत्रीपदाची निवड केली जाणार

  • 04 Mar 2023 06:15 AM (IST)

    मालेगाव तालुक्यात चोऱ्या वाढल्या, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

    जीवघेणा हल्ला करून चोऱ्या वाढल्या

    तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ग्रामीण भागातील नागरिकांनी उभे केले प्रश्न चिन्ह

    ठोस कारवाई व्हावी यासाठी अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन

    हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

  • 04 Mar 2023 06:13 AM (IST)

    इयत्ता 12 वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही

    राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

    3 मार्च रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाले होते

    तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही

    यामुळे इयत्ता 12 वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे

Published On - Mar 04,2023 6:09 AM

Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.