AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Currency Printed Note : हा देश छापतो जगभरातील नोटा! अनेक देशांची अर्थसत्ता अशी घेतली ताब्यात

Currency Printed Note : जगातील अनेक देशांच्या चलनी नोटा छापण्यात या देशाने आघाडी घेतली आहे. यामाध्यमातून या देशाने अनेक देशांची अर्थसत्ता ताब्यात घेतली आहे. थायलंड, नेपाल, श्रीलंका, पोलंड, बांग्लादेश सहित अनेक देश येथे नोटा छापतात. त्यामुळे हा देश आर्थिकदृष्ट्या शक्तीशाली होत आहे.

Currency Printed Note : हा देश छापतो जगभरातील नोटा! अनेक देशांची अर्थसत्ता अशी घेतली ताब्यात
| Updated on: Mar 04, 2023 | 5:41 PM
Share

नवी दिल्ली : जगातील अनेक देश आधुनिक तंत्रज्ञान नसल्याने आणि प्रिटिंगसाठीचा (Printing) आवाढव्य खर्च टाळण्यासाठी इतर देशांकडून त्यांच्या चलनी नोटा (Currency Notes) छापून घेतात. चीनने यामध्ये आघाडी घेतली आहे. चीनमध्ये जगभरातील अनेक देश त्यांच्या चलनी नोटा छापून घेतात. या देशांची यादी भली मोठी आहे. थायलंड, नेपाल, श्रीलंका, पोलंड, बांग्लादेश सहित अनेक देश चीनमधूनच (China) नोटा छापून घेतात. पण ड्रॅगन यामाध्यमातून जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी खेळी खेळत आहे. इतर देशांच्या आर्थिक धोरणात चीनचा आपोआप प्रभाव, दबदबा वाढत आहे. एकीकडे नोटा छपाईतून चीनने भरमसाठ कमाई केली आहे. तर दुसऱ्या देशांच्या अर्थसत्ताही एकप्रकारे चीनने ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला आहे.

चीनची बँकनोट प्रिटिंग ॲंड मिंटिंग कॉर्पोरेशन अनेक देशांच्या नोटा छापण्यासाठी दिवसरात्र एक करते. मोठ्या करन्सी ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी चीनमधील मनी प्रिटिंग प्लँट पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. इतर देशांच्या चलनी नोटा छापण्याचे कंत्राट इतके मोठे आहे की, या प्रिटिंग प्रकल्पात रात्रंदिवस काम सुरु आहे. एका प्लँटमध्ये कामाचा तुटवडा नाही. कर्मचाऱ्यांना अनेक शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. युआन प्रांतात हा प्रिटिंग प्रकल्प आहे. वन बेल्ट ॲंड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पातील अनेक देशांनी चीनकडे नोट छापण्यासाठी रांग लावली आहे.

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये एका ही देशाचे चलन छापण्यात येत नव्हते. परंतु, 2013 मध्ये बीजिंगमध्ये वन बेल्ट ॲंड रोड इनिशिएटिव्ह या महत्वकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली. या प्रकल्पात युरोप, अफ्रिका आणि आशियातील जवळपास 60 देशांना आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याचे गाजर दाखवून एकप्रकारे मांडलीक करण्यात येत आहे. शेजारील श्रीलंका, पाकिस्तान हे त्यांची उदाहरणे आहेत. या देशातील अर्थसत्ताच नाही तर राजकीय धोरणातही चीनने शिरकाव केलेला आहे.

चायना बँकनोट प्रिटिंग ॲंड मिंटिंग कॉर्पोरेशनचे मुख्यालय बीजिंगमधील जिचेंग जिल्ह्यात आहे. यामध्ये 18,000 कर्मचारी काम करतात. ही प्रिटिंग प्रेस चीन सरकारच्या मालकीची आहे. यावर संपूर्णतः चीन सरकारचे नियंत्रण आहे. छपाईसाठी या प्रिटिंगचे 10 युनिट आहेत. ही जगातील सर्वात मोठी प्रिटिंग प्रेस असल्याचा दावा करण्यात येतो. त्यानंतर अमेरिकेतील नोटांची छपाई करणारी प्रिटिंग प्रेस आहे. अमेरिकेतील ब्युरो ऑफ एनग्रेविंग ॲंड प्रिंटिंग कंपनीकडे सध्या 2,000 कर्मचारी आहे.

मोबाईलवरुन ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. अनेक देशांनी छोट्या वित्तीय संस्थांना आर्थिक व्यवहार सुटसुटीत होण्यासाठी रक्कम हस्तांतरणाचा पर्याय दिला आहे. क्यूआर कोड आधारे कोणतीही व्यक्ती सहज आणि सोप्या पद्धतीने व्यवहार पूर्ण करत असल्याने अनेक देशांनी चीनमधील नोटा छपाईच्या कंत्राटात कपात केली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.