HSC Exam | बारावीचा गणिताचा पेपर फुटला की नाही? शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण, पुन्हा परीक्षा होणार?

इयत्ता बारावीचा गणित विषयाचा पेपर फुटल्याची सध्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये चर्चा आहे. विशेष म्हणजे या चर्चेमुळे गणिताची परीक्षा पुन्हा होईल की काय? असा प्रश्न उपस्थित झालेला. पण शिक्षण मंडळाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

HSC Exam | बारावीचा गणिताचा पेपर फुटला की नाही? शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण, पुन्हा परीक्षा होणार?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 10:41 PM

मुंबई : राज्यात सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुक्रवारी गणिताचा पेपर झाला. हा पेपर सुरु होण्याआधी बुलडाण्यातील सिंदखेड राजा येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या अर्धा तास आधी पेपर फुटल्याची बातमी समोर आलेली. विशेष म्हणजे प्रश्नपत्रिकेची दोन पानं सोशल मीडियावर व्हायरलही झालेली. त्यामुळे गणिताचा पेपर परत होईल, अशी चर्चा सुरु झालेली. याच चर्चांवर अखेर राज्य शिक्षण मंडळाकडून अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सिंदखेडराजा येथे पेपर फुटीचा प्रकार असा काहीच घडलेला नाही. कारण तसं काही आढळलेलं नाही. त्यामुळे गणिताचा पेपर पुन्हा होणार नाही, असं स्पष्टीकरण शिक्षण मंडळाकडून देण्यात आलं आहे.

शिक्षण मंडाळाने नेमकं काय म्हटलंय?

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत 3 मार्च 2023 रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता 12 वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी साडेदहानंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात साडेदहा वाजेपर्यंत व दुपार सत्रात अडीच वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात फिर्याद क्र. ००३७ अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभेतही पडसाद

बुलडाण्यात परीक्षा सुरु होण्याच्या अर्धा तास आधी सिंदखेडराजा येथील परीक्षा केंद्रावरुन गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आलेली. गणिताचा पेपर सकाळी साडेदहा वाजता सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळातही बघायला मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत या विषयी नाराजी व्यक्त केलेली.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.