PM Narendra Modi : पंतप्रधानांचा थॉमस चषकाच्या खेळाडूंसोबत संवाद, खेळाडूंनीही शेअर केले अनुभव

| Updated on: May 22, 2022 | 11:30 AM

थॉमस चषक जिंकणाऱ्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आपले अनुभव शेअर केले. यादरम्यान, पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

PM Narendra Modi : पंतप्रधानांचा थॉमस चषकाच्या खेळाडूंसोबत संवाद, खेळाडूंनीही शेअर केले अनुभव
पंतप्रधान मोदींनी थॉमस चषकच्या खेळाडूंची भेट घेतली
Image Credit source: ANI
Follow us on

दिल्ली : नुकत्याच झालेल्या थॉमस आणि उबेर चषकात (Thomas Cup and Uber Cup) भारतीय संघाने जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत 14 वेळचा चॅम्पियन इंडोनेशियाचा (Indonesia) पराभव करून भारताने प्रथमच विजेतेपद पटकावले. टीम इंडिया पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर थॉमस आणि उबेर चषकात यशासह ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi), यांनी भेट घेतली. यावेळी सर्व खेळाडूंनी आपले अनुभव पंतप्रधानांसोबत शेअर केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भारताला थॉमस कप जिंकून देण्यात किदांबी श्रीकांत (Kidambi Srikanth), चिराग-सात्विक जोडी आणि लक्ष सेन (Lakshya Sen) यांनी सर्वाधिक योगदान दिले आहे. याशिवाय एचएस प्रणॉयनेही कठीण काळात जखमी असतानाही विजय मिळवून देशाला चॅम्पियन बनवलं होतं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचे भरभरून अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी खेळाडूंची भेट घेतली

खेळाडूंनी त्यांचे अनुभव शेअर

थॉमस चषकातील खेळाडूंनी त्यांचे अनुभव यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शेअर केले. संवाद साधताना खेळाडूंनी त्यांचे अनुभव कसे होते, त्यावेळची काय परिस्थिती होती, याची माहिती पंतप्रधान मोदींना दिली. भारताचा स्टार खेळाडू किदांबी श्रीकांत याने देखील आपला अनुभव पंतप्रधान मोदी यांच्यासोबत शेअर केला.

किदांबी श्रीकांतचा पंतप्रधानांसोबत संवाद

प्रभावी कामगिरी

लक्ष्य सेन आणि एसएस प्रणॉय यांनी या स्पर्धेतील जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि भारताला चॅम्पियन बनवले. याशिवाय पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनेही प्रभावी कामगिरी केली आणि जेव्हा जेव्हा टीम इंडिया अडचणीत आली तेव्हा दोघांनीही विजय मिळवून दिला आणि टीम इंडियाला प्रोत्साहन दिले.

14 वर्षांची शटलर उन्नती हुड्डा

पंतप्रधानांचा खेळाडूंसोबत संवाद

लक्ष सेन काय म्हणाला?

लक्ष सेननं सांगितलं की, दुसऱ्या सामन्यापूर्वी त्याला अन्नातून विषबाधा झाली होती. यामुळे तो सामना खेळू शकला नाही. यावर मोदींनी गंमतीत म्हटलं की खाण्यापिण्याची काय सवय आहे. सर्व खेळाडूंनी हे देखील सांगितलं की याआधी ते कधी पंतप्रधानांना भेटले होते किंवा फोनवर बोलले होते. यासोबतच त्यांनी पंतप्रधानांशी बोलल्याने त्यांचे मनोबल कसे दुप्पट होते हेही सांगितलं.

किदांबी श्रीकांत काय म्हणाला?

बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय

थॉमस चषक जिंकणाऱ्या भारतीय संघाशी पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी फोनवर चर्चा केली होती. तो म्हणाला की तू चमत्कार केला आहेस. तुमचा विजय अनेक खेळाडूंना प्रेरणा देईल. यानंतर खेळाडू खूप आनंदी दिसत होते.

मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद

थॉमस कपमध्ये भारताने इतिहास रचला

भारताने थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत टीम इंडियाने 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशिया संघाचा 3-0 असा पराभव केला. या विजयाने बॅडमिंटनचे साम्राज्य तर प्रस्थापित केलेच पण या खेळातील डेन्मार्क, मलेशिया, इंडोनेशिया आणि चीनची राजवट आता संपल्याचेही दाखवून दिले.

उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाचा 3-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली तेव्हाच भारतीय संघाने या स्पर्धेत इतिहास रचला. 43 वर्षांनंतर प्रथमच भारताने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी हा संघ 1952, 1955 आणि 1979 मध्ये उपांत्य फेरीत पोहोचला होता.

थॉमस कप जिंकणारा भारत सहावा संघ ठरला

उपांत्य फेरीत टीम इंडियाने डेन्मार्कचा 3-2 असा पराभव करून स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला आणि पहिल्याच अंतिम फेरीत ही स्पर्धा जिंकली. थॉमस कपमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. थॉमस चषकात भारताचे हे पहिले पदक आहे. ही स्पर्धा जिंकणारा भारत हा सहावा संघ आहे.