Video : एवढेच बाकी होते.. अतिरिक्त ऊस उत्पादकाचा संसार उघड्यावर, शेतकऱ्याचा रोष यंत्रणेवर

Video : एवढेच बाकी होते.. अतिरिक्त ऊस उत्पादकाचा संसार उघड्यावर, शेतकऱ्याचा रोष यंत्रणेवर

मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. काही दिवसांपूर्वीच गेवराई तालुक्यातील नामदेव जाधव याने अतिरिक्त उसाच्या धास्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर वडवणी तालुक्यातील एका शेतकऱ्याने तर ऊसाच्या फडालाच आग लावून हा प्रश्न मिटवला होता. आता 20 महिन्याचा कालावधी झाला असतानाही ऊस फडातच असल्याने या साखर कारखानदारांनीच आपल्याला रस्त्यावर आणले म्हणत संसार रस्त्यावरच थाटलेला आहे.

महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: राजेंद्र खराडे

May 22, 2022 | 11:47 AM

बीड :  (Sugarcane) ऊसाचे उत्पादन घेणे हा काही गुन्हा नाही..अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो साखर कारखान्यांच्या यंत्रणेमुळे..कारखान्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आज कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही मुश्किल झाले आहे.. या (Sugar Factory) साखर कारखानदारांनीच माझा संसार उघड्यावर आणल्याचे सांगत (Ambajogai) आंबाजोगाई तालु्क्यातील धानोरा खुर्द येथील रवींद्र ढगे यांनी ऊसाच्या फडाला लागून असलेल्या रस्त्यावर आपला संसार थाटला आहे. अखेर साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणलेच या मागची व्यथा ढगे यांनी अगदी आकांताने मांडली आहे. रस्त्यावर ऊस, संसारउपयोगी साहित्य आणि आपल्या मुलाला घेऊन शेतकऱ्याचा आक्रोश असलेला व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अतिरिक्त ऊस उत्पादकांच्या व्यथा

मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. काही दिवसांपूर्वीच गेवराई तालुक्यातील नामदेव जाधव याने अतिरिक्त उसाच्या धास्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर वडवणी तालुक्यातील एका शेतकऱ्याने तर ऊसाच्या फडालाच आग लावून हा प्रश्न मिटवला होता. आता 20 महिन्याचा कालावधी झाला असतानाही ऊस फडातच असल्याने या साखर कारखानदारांनीच आपल्याला रस्त्यावर आणले म्हणत संसार रस्त्यावरच थाटलेला आहे. ऊसाच्या फडाला लागूनच रवींद्र ढगे यांनी संसार मांडला आहे. शिवाय यंत्रणेने आपली कशी फसवणूक केली याचा त्यांनी पाढाच वाचला आहे.

आंदोलनाकडे दुर्लक्ष

अतिरिक्त ऊसाची तोड वेळेत व्हावी म्हणून ढगे यांनी आतापर्यंत साखर कारखान्याचे उंबरठे तर जिझवलेच पण प्रशासकीय कार्यालयातही खेटे मारले आहेत. मात्र, उसाबाबत केवळ शेतकरी चिंतेत असून यंत्रणेला याबाबत काही देणे नाही. हंगामाच्या सुरवातीपासूनच साखऱ कारखाना आणि प्रशासकीय यंत्रणेने अतिरिक्त उसावर उपाययोजना केली असती तर आज ही वेळ आली नसती. मराठवाड्यातच अतिरिक्त उसाचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. कालावधी तर पूर्ण झालाच आहे पण आता ऊसाचे क्षेत्र रिकामे करुन इतर पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

आता रस्त्यावरच राहण्याचा निर्धार

अतिरिक्त उसाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आता रस्त्यावरचा संसार हटविणार नसल्याची भूमिका रवींद्र ढगे यांनी घेतली आहे. रवींद्र ढगे यांच्या उसाला 19 महिने लोटले तरी कारखाना ऊस नेत नाही. त्यामुळे हा ऊस जावा याकरिता ढगे यांनी प्रशासनास वारंवार निवेदन दिले. मात्र काही उपयोग झाला नाही. आता कारखाना ऊस नेत नाही. तोपर्यंत कुटुंबासह रस्त्यावरच राहणार असा निर्णय ढगे यांनी घेतला असून या संतप्त शेतकऱ्याने आपली व्यथा आकांताने मांडली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें